Vaidya Gogate Memorial Foundation
Vaidya Gogate
Memorial Foundation
About Us
Events
Gallery
Videos
Articles
Shop
Clinics
Contact
Certificates
Legal
Signed out
Vaidya Gogate Memorial Foundation

Vaidya Gogate

Memorial Foundation

Ayurveda education, publications and clinical care.

102, Ramprasad Chambers, 368/1, Jawaharlal Nehru Rd, near Kirad Hospital, above Shraddha Medicals, New Nana Peth, Pune, Maharashtra 411002

Clinic hours: Monday–Thursday, 6:00 PM–10:00 PM

care@vaidyagogate.org093737 92952

Explore

  • About Us
  • Events
  • Gallery
  • Videos
  • Articles
  • Shop
  • Clinics
  • Contact
  • Certificates

About Us

  • About Us
  • Foundation
  • Legacy of Vaidya R. B. Gogate
  • Dr. Anagha Gogate
  • Awards & Accolades
  • Competition awards
  • Special thanks
  • Books & Research
  • Our History
  • Trustees & Team

From the Foundation

  • Contact
  • Certificates

Connect

© 2026 Vaidya Gogate Memorial Foundation. All rights reserved.

PrivacyTermsShippingReturnsRefundCancellationFAQTrack a shipment

Developed by Capture Visual Studios

Home/Articles
Ayurveda4 Nov 2026

आयुर्वेद आऊटडेटेड ? मुळीच नाही .1

Published by Vaidya Gogate Memorial Foundation

Share

FacebookXLinkedInWhatsAppTelegramEmail

आयुर्वेद आऊटडेटेड ? मुळीच नाही .1 गेल्या दोन-तीन दशकांत जगभर निरनिराळ्या वैद्यक प्रणाली प्रकाशझोतात येणे हेच मुळी सध्याच्या मान्यवर वैद्यक प्रणालीमधील कमीपणा ,दुर्गुण किंवा अजून बरंच काही न समजलेलं आहे हे त्याचे द्योतक आहे. चीन स्वतःच्या अशा चायनीज मेडिसिनचा स्वतःचे वैद्यक शास्त्र म्हणून पुरस्कार करते. भारताला मात्र आयुर्वेद हे भारतीय वैद्यक शास्त्र आहे हे म्हणावेसे वाटत नाही हे आमचे मोठे दुर्दैव आहे. इ.पू.2000 पर्यंत आयुर्वेद वाढला तो राजाश्रयामुळे.त्यानंतर आक्रमणे, बुद्ध धर्माचा उगम आणि ब्रिटिशांचा व्यापाराच्या दृष्टीने आलेला साम्राज्यवाद यामुळे खरंतर आयुर्वेद प्रगती करू शकला नाही. आयुर्वेदा बरोबर उदयास आलेले अश्व आयुर्वेद,हत्ती आयुर्वेद व वनस्पती आयुर्वेद ही शास्त्रे त्यावेळी राजाश्रयामुळे पुढे आली.युद्धांत घोडे, हत्ती यांचा भरपूर वापर होत असे.त्यामुळे त्यांची आजारपणे , युद्धातील जखमा यावर तज्ञ माणसाकडून उपचारही आवश्यकच होते. आयुर्वेद अपरिवर्तनीय आहे का? आयुर्वेदाला सुरुवातीपासूनच परिवर्तन मान्य आहे. आयुर्वेद शास्त्रात कालानुरूप बदल होतच गेले आहेत. समजण्यासाठी आपण दोन-तीन उदाहरणे पाहू. आयुर्वेदाने सुरुवातीच्या काळात माणसाने पाणी थोडेसे प्यावे असे ठाम सांगितले पण नंतर तोच सकाळी पाण्याचे उषःपान करावे असे सांगू लागला. चरकाचार्यांनी मज्जागत वात असाध्य सांगितला. तोच पुढे एक हजार वर्षांनी सुश्रुतांनी शस्त्रकर्म साध्य सांगितला. चरकांपर्यंत मांसार्बुद व रक्तार्बुदे ( कॅन्सर ट्युमर्स) संपूर्ण काढून टाकून पुन्हा न होण्यासाठी तेथे अग्निकर्म करीत असत. सुश्रुतांनी पुढे ती असाध्यच आहेत असे लक्षात आल्यावर शस्त्रकर्मात यश इच्छिणाऱ्या वैद्याने त्यावर शस्त्रकर्म करू नये असेच सांगितले. पुढे त्यातील काही अर्बुदे संपूर्ण काढून टाकल्यावर बरी होतात (लोकली मॅलिग्नंट ट्युमर्स ) असे पाचशे वर्षानंतर लक्षात आल्यावर वाग्भटाने चरकांच्या चिकित्सेचा पुरस्कार केला. आता चार हजार वर्षांचा काळ होऊन गेला तरी वरील स्थितीत फार मोठा बदल घडला आहे असे दिसत नाही. चरकाचार्य यांचा भर अनुमान प्रमाणावर होता. पुढे सुश्रुत प्रत्यक्ष प्रमाणांवर आले. चरकाचार्यांनी सांगितलेल्या रसायन चिकित्त्सेत पंधराशे वर्षानंतर खूप बदल घडवून आणला. रसायन चिकित्सेची सुरुवातच त्याने कालानुसारिणी म्हणून केली. ते म्हणतात चरकाचार्यांनी सांगितलेली रसायन चिकित्सा अति उत्तम आहे. पण त्या पद्धतीने चिकित्सा घेण्यास लोकांची मानसिकता राहिलेली नाही. तसेच त्यावेळच्या अनेक वनस्पती दुर्मिळ आहेत किंवा उपलब्ध नाही. म्हणून मी घरच्या घरी उन्हा पावसात घेता येण्यासारखी सुलभ अशी रसायन चिकित्सा लिहित आहे . बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर सुश्रुताने माणसाच्या मृत शरीराचे विच्छेदन करून शरीर अवयवांचा अभ्यास करावा असं सांगितलं व त्याची पद्धतही वर्णन केली. त्वचा सात थरांची असते एवढी प्रगतीही झाली. या शवविच्छेदनात शरीरावयव समजून घेण्याचा प्रयत्न. पोट व छातीत खालील महत्वाचे भाग आहेत. ( अग्न्याशय (आमाशय व ग्रहणी) ,पक्वाशय, मूत्राशय, यकृत, हृदय, उण्डूक, फुप्फुस ) हे प्रत्यक्ष डिसेक्शन केल्याखेरीज अनुमानाने कसे लिहिता येईल ? सामाजिक वातावरण, प्रिझर्वेशन तंत्रात न झालेली प्रगती , बुद्ध धर्माचा प्रवेश, सूक्ष्मदर्शक यंत्रासारख्या यंत्रांची अनुपस्थिती यामुळे त्यात प्रगती झाली नाही हे सत्य. त्यावेळी हायड्रो डिसेक्शन होते. माझी माहिती चुकीची नसेल तर ॲनाटोमी च्या इतिहासात एक मनोरंजक माहिती आहे.एक हॉटेल चालक होता. त्याचं नॉनव्हेज हॉटेल होते. त्यामुळे गिऱ्हाईकांच्या खाद्यासाठी रोजच बकऱ्या, ससे, हरणे, डुक्कर कापले जायचे. त्यामुळे त्यांच्या पोटात काय दडले आहे हे त्याला ठाऊक होते. काही दिवसांनी त्याच्या मनात मानवी शरीरात काय दडलंय असं पाहण्याची इच्छा निर्माण झाली. त्याने अधून मधून एकेक प्रवाशांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. त्यात खून करणे किंवा संपत्ती करणे असा विचार नव्हता तर होती जिज्ञासा. सुश्रुताने ब्लॅडर स्टोन साठी पेरी / पॅरायुरेथ्रल छेद घ्यावयास सांगितला आहे (पूर्वी अमेरीकेत सुद्धा याच ॲप्रोचने प्रोस्टेट ऑपरेशन करीत असत )अश्मरी काढताना ब्लॅडरवर एक छेद घेतला गेला पाहिजे असे आवर्जून सांगितले आहे. दोन ठिकाणी छेद झाल्यास रुग्ण लगेच किंवा काही दिवसांनी मरण्याची (एक्सट्रा व्हजेशन ) शक्यता दिली आहे.अश्मरी काढताना त्याचे तुकडे होणार नाहीत याची काळजी घ्यावयास सांगितली आहे .असा तुकडा आत राहिला तर पुन्हा मुतखडा होण्याची शक्यता सांगितली आहे.अश्मरी काढण्यासाठी केलेल्या जखमेतून सात दिवस मूत्र येईल व ते आपोआप थांबेल. तसे ते न थांबल्यास त्या व्रणावर अग्नीने डाग द्यावा असे सांगितले आहे .सध्याच्या पद्धतीमध्ये काहीवेळा खडा न निघण्याची त्याचे तुकडे आत राहण्याची त्यासाठी दोन-तीन वेळा पुन्हा प्रोसिजर करण्याची आवश्यकता असते असे आधीच लिहून घेतले असते.रुग्णांच्या दृष्टीने शाश्वत पद्धत कोणती? युरेथ्रॉमीची जखम भरून येण्यास सध्याचा मान्यवर काळ व सुश्रुत यांचा काळ यात काय फरक पडला?आयुर्वेदाने प्रत्यक्ष केलेल्या अनुभवाचे प्रमाण पत्रच खालील श्लोकात देऊन टाकले आहे. इदम् आगम सिद्धत्वात प्रलक्ष फलदर्शनात् । मंत्रवत् संप्रवक्तव्यं मा मिमांसु कदाचन्॥ ग्रंथात आम्ही उल्लेखलेली औषधे, रोग लक्षणे ,रोग निदान याचा अनुभव आम्ही अनेक रुग्णांवर घेऊनच त्याची नोंद ग्रंथात केली आहे. त्यांच्यावरच्या चाचण्यांनी (आगम ) ती सिद्ध झालेली आहेत. त्यांच्याबद्दल शंका न घेता ती शास्त्रीय पद्धतीने वापरा. गुण येईल. आयुर्वेदशास्त्र पुढे म्हणते की कोणतेही शास्त्र पूर्णत्वाला नसते. प्रत्येक शास्त्राला त्याच्या त्याच्या मर्यादा असतात. त्यामुळे निदान निश्चिती किंवा इतर चिकित्सेमध्ये अडचण येईल त्यावेळी इतर चिकित्सा पद्धतींचा वापर करावा. आयुर्वेदा खेरीज इतरही वैद्यकीय शास्त्रांचा अभ्यास करावा. रुग्णाच्या रोगाबद्दल/ चिकित्सेबद्दल शंका असल्यास इतर वैद्यांशी संवाद साधावा. त्याचा उपयोग आपला संशय नाहीसा करण्यासाठी जरूर होईल. व्यवसाय करताना इतर समव्यवसायी चिकित्सकांची निंदा करू नका. एकं शास्त्रधीयानो न विद्याच्छात्र निश्चयम् । तस्मात् बहुश्रुत: शास्त्रं विजानिया च्चिकित्सक: ॥ सुसू ४/६,७ प्रत्यक्षतो हि यत् दृष्ट शास्त्रदृष्टं च यद्भवेत । समासतस्तदुभयं भूयोज्ञान विवर्धनम् ॥ सुशा ५/४८ ताप सात दिवस सतत येतो इन्फ्ल्यूंझा सात दिवसाचा असतो दमेकऱ्याचा श्वास आकाशात ढग आले असता रात्रीच्या वेळी वाढतो.बसून बरे वाटते ही आयुर्वेदातील दम्याची लक्षणे वअस्थमा ची लक्षणे यात काय फरक पडला? इन्फ्लूएंजा चा पॉझिटिव्ह ऑरगॅनिसम सापडला ही शास्त्रात भर पडली. सुंठ मिरे पिंपळी यासारखी आयुर्वेदिक औषधे गेली चार हजार वर्षे तशीच राहिली. आजही त्यांची उपयुक्तता त्याच रोगांवर किंवा लक्षणांवर तशीच दिसते .याउलट सध्याची औषधे बाजारात येण्यापूर्वी सर्व अमेरिकन चाचण्या करून येतात व काही वर्षातच व्यवहारातून नष्ट होतात. ए मेटिन, स्ट्रिक्निन , काही शूलघ्न द्रव्य, मरक्यूरी यल डाययुरेटीक्स अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यामानाने आयुर्वेदिक औषधांमध्ये इतक्या लवकर बदल झालेले दिसत नाही. आयुर्वेदशास्त्र स्वतःला परिपूर्ण शास्त्र म्हणून संबोधून घेत नाही. आयुर्वेद म्हणतो आम्हाला कळलेल्या गोष्टींपेक्षा न कळलेल्या अनेक गोष्टी आहेत. सध्या आपणाकडे येणारे रुग्ण अनेक चाचण्याच्या दिव्यांतून बाहेर पडून आपणाकडे येतात. काही चाचण्यां खाली लिहिलेले असते, ''प्लीज कोरिलेट क्लीनिकली" याचा अर्थच असा की या चाचण्यांच्या पलीकडे अजून न समजलेले बरेच आहे आणि मग पुन्हा निदानासाठी उपलब्ध असतो तो बोलता चालता संवेदनाक्षम रूग्ण आणि वैद्य व त्याची पंचज्ञानेंद्रिय अनुभव व मेंदू. मुखाचा कॅन्सर तंबाखू खाणाऱ्यांना व न खाणाऱ्यांनाही होतो याचं खरं तर उत्तर नाही. आणि म्हणूनच आयुर्वेद व्यक्तीसापेक्ष चिकित्सेवर भर देतो. आयुर्वेदाने अनेक औषधांचे कार्यकारीत्व रस , वीर्य , विपाक यांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला.पण जेथे कार्य तर दिसते पण ते आयुर्वेदाच्या पायाभूत सिद्धांतात बसत नाही त्यावेळी ते द्रव्य प्रभावानी काम करते असे म्हटले.माझी चूक होत नसेल तर मायग्रेन वर काम करणारे एरगॉट नक्की कसे काम करते याचा थांगपत्ता लागलेला नाही. आयुर्वेदाने पंचज्ञानेंद्रियांच्या मर्यादा मान्य केल्या आहेत.त्याच्या पलीकडचे ज्ञान तपस्वी ज्ञानी मुनीच सांगू शकतील.ते काम आता फिजिक्स , बायो फिजिक्स , एक्स-रे ,सिटीस्कॅन, इलेक्ट्रॉनिक यांचा शोध लावणाऱ्या मुनींनी (शास्त्रज्ञ ) केले आहे त्याला आयुर्वेदाचा विरोध कसा असेल !

Related articles