Vaidya Gogate Memorial Foundation
Vaidya Gogate
Memorial Foundation
About Us
Events
Gallery
Videos
Articles
Shop
Clinics
Contact
Certificates
Legal
Signed out
Vaidya Gogate Memorial Foundation

Vaidya Gogate

Memorial Foundation

Ayurveda education, publications and clinical care.

102, Ramprasad Chambers, 368/1, Jawaharlal Nehru Rd, near Kirad Hospital, above Shraddha Medicals, New Nana Peth, Pune, Maharashtra 411002

Clinic hours: Monday–Thursday, 6:00 PM–10:00 PM

care@vaidyagogate.org093737 92952

Explore

  • About Us
  • Events
  • Gallery
  • Videos
  • Articles
  • Shop
  • Clinics
  • Contact
  • Certificates

About Us

  • About Us
  • Foundation
  • Legacy of Vaidya R. B. Gogate
  • Dr. Anagha Gogate
  • Awards & Accolades
  • Competition awards
  • Special thanks
  • Books & Research
  • Our History
  • Trustees & Team

From the Foundation

  • Contact
  • Certificates

Connect

© 2026 Vaidya Gogate Memorial Foundation. All rights reserved.

PrivacyTermsShippingReturnsRefundCancellationFAQTrack a shipment

Developed by Capture Visual Studios

Home/Articles
Ayurveda4 Nov 2026

आयुर्वेद आऊटडेटेड ? मुळीच नाही .2

Published by Vaidya Gogate Memorial Foundation

Share

FacebookXLinkedInWhatsAppTelegramEmail

आयुर्वेदातील पायाभूत कल्पना चुकीच्या आहेत का? चार हजार वर्षापूर्वीच्या ज्ञानाचा विचार केला तर तसे वाटण्याचे मुळीच कारण नाही कारण काहीतरी गृहीत धरूनच पुढे जावे लागते शून्य गृहीत धरले तेव्हा त्याची पुढे एक झाली माणसाची उत्पत्ती कशी झाली त्यासाठी एडम व अवतार घ्यावा लागला आणि नंतर शास्त्राची प्रगती होत गेली तशी अनेक गोष्टींची उकल होत गेली.आयुर्वेदाची सुरुवात फुलातून सूक्ष्मात आहे असं म्हणलं तर चूक होणार नाही.ब्रह्मांडात आहे तेच प्राण्यांमध्ये आहे तेच वनस्पतीत आहे हे निरीक्षणाच्या आधारे गृहीत धरून आयुर्वेदाने पुढची वाटचाल केली.याची आपण दोन-तीन उदाहरणे पाहू. दही लागल्यावर ते भांड्याला घट्ट चिकटून असते त्याला हलवले नाही तर ते जागचे हलत नाही पण त्यात नुसता समस्या खूपसा त्याला लगेच पाणी सुटेल.याचा अर्थच असा की दह्याचा मूळ स्वभाव विघटनाचा आहे असेही दही वारंवार शरीरात गेले तर ते पेशींमध्ये आज ना उद्या विघटन घडवून आणणारच. गावरान ज्वारी हायब्रीड ज्वारी.दोघांच्या निर्मितीचा काळ सुमारे अनुक्रमे चार व तीन महिन्यांचा.हायब्रीड ज्वारी चे उत्पन्न भरपूर असते पण ती चवीला चांगली नसते ती लवकर खराब होते व त्याला भुंगाही लवकर लागतो. टोमॅटोचे रोप लावल्यावर लगेच वाढू लागते.पण त्याला आधार दिला नाही तर त्याच्या फांद्या मोडू लागतात.फळे लागतात त्याला कीड लागते पिकतात आणि नासतातही लवकर.याच्या उलट आवळा फळ.निर्मितीला वेळ लागतो आधार लागत नाही उडायला हि कठीण खोडून काढून ठेवला तर महिना-महिना रंग न बदलता तसाच राहतो सुकल्यावर त्याच्या कडकपणाही सोडत नाही.आता असे हे दोन प्रकारचे पदार्थ सातत्याने शरीरात गेले तर त्याचे शरीरावर काय परिणाम दिसतील ते आपणच ठरवा.असा हा निरीक्षणात्मक विचार चुकीचा कसा?पुढे या क्रिया समजावून घेण्यासाठी रस वीर्य विपाक का च्या माध्यमातून विचार झाला आणि मग त्यातून निष्कर्ष काढणे त्याची अनेक द्रव्यांवर व शरीर गुणधर्माने पडताळणी झाली नंतर त्याचे रस वीर्य विपाक सिद्धांतात रुपांतर झाले.उष्ण आणि शीत सर्व जगामध्ये स्पर्शाला किंवा शरीरात गेल्यानंतर दोनच संवेदना स्थायी स्वरूपाने आढळतात गरम किंवा गार रुग्ण सापेक्ष संवेदना तशाच असतात.औषध गरम पडलं /गार पडले,अंग गरम झाले / गार पडले.ही दोन्ही तत्त्वे आपल्या शरीरात असतात व ती एकमेकांना सांभाळून असतात.त्याच्यामध्ये बिघाड झाला तर त्याचे परिणाम शरीरावर लगेच दिसतात.उष्ण तत्व वाढले तर ताप येईल,अंगाची आग होईल.शीत तत्व वाढले तर लघवीचे प्रमाण वाढेल ,थंडी सहन होणार नाही ,अंगावर पांघरून घ्यावेसे वाटेल.यश स्थूल संवेदना पुढे वात-पित्त-कफ भाषा माध्यमातून सूक्ष्म माकडे नेल्या त्याचे निरनिराळे आविष्कार मांडले.त्यांचे पुढे अनेक व्यक्तींवर रुग्णांवर निरीक्षण झाल्यावर तो सिद्धांत झाला. सृष्टी निरीक्षण-औषधी द्रव्यांच्या बाबतीतही त्या वनस्पतीची स्वाभाविक प्रवृत्ती प्राण्याचा रोग झाल्यावर व रोग नसताना विशिष्ट वनस्पती खाण्याकडे कल त्यांचे त्यांच्या वर होणारे परिणाम याचा सतत अभ्यास झाला बरेच पक्षी आपल्याच सूचीतून झाडांचे फुलांचे फळांचे रस घेतात व व आपल्या गुदद्वारात घालतात व रोगमुक्त होतात.यावरून एनिमाची व औषधे गुदावाटे देण्याची कल्पना आली त्याची पडताळणी झाली व पुढे त्याचे बस्ती चिकित्सेत रूपांतर झाले. हत्ती निसर्ग तहास शिंगाडे कमल कंद बिया खूप खातात हत्ती आयुर्वेदा हे पदार्थ हत्ती मध्ये वृष्यता दाखवितात व त्याच्यामध्ये ॲबॉर्शन चे प्रमाणही कमी आढळते.शिंगाडा पाण्यात असतो त्याचा आतला गर पाण्यात असूनही कुजत नाही त्याला कीड ही लागत नाही आणि हीच कल्पना बाळ पोटात असते ते पाण्यात असते त्याचा नाश होऊ न देण्यासाठी व त्यामुळे होणारा गर्भपात टाळण्यासाठी शिंगाडा हा पदार्थ गर्भ संस्थापक म्हणून आयुर्वेदात आला. दूर्वा कितीही नाहीशा करण्याचा प्रयत्न केला ताक शिंपडणे सोडून तर त्या नाश पावत नाही ती एका टोकाला तोडली तर दुसऱ्या बाजूने वाढू लागते त्याच्या प्रत्येक तेरा तून खंडातून फुटवा येतो ज्या रुग्णांमध्ये वार सुटण्याच्या मुळे गर्भपात होण्याची प्रवृत्ती असते त्या ठिकाणी गर्भ स्थापक म्हणून आयुर्वेदाने दुर्वांचा वापर सांगितला दुर्वा सुरू केल्यानंतर तेथे ताक अपथ्यकर म्हणून आलेच या दोन्ही द्रव्यांचे व्यवहारात अनुभव आहेत पण आम्हा वैद्यांना त्याच्या नोंदी न ठेवण्याची वाईट सवय आहे हा आमचा दुर्गुण आहे नोंदी ठेवल्यावर निदान एव्हिडन्स बेस्ट मेडिसिन म्हणून तरी ते जगाच्या पाठीवर येईल .

Related articles