Vaidya Gogate Memorial Foundation
Vaidya Gogate
Memorial Foundation
About Us
Events
Gallery
Videos
Articles
Shop
Clinics
Contact
Certificates
Legal
Signed out
Vaidya Gogate Memorial Foundation

Vaidya Gogate

Memorial Foundation

Ayurveda education, publications and clinical care.

102, Ramprasad Chambers, 368/1, Jawaharlal Nehru Rd, near Kirad Hospital, above Shraddha Medicals, New Nana Peth, Pune, Maharashtra 411002

Clinic hours: Monday–Thursday, 6:00 PM–10:00 PM

care@vaidyagogate.org093737 92952

Explore

  • About Us
  • Events
  • Gallery
  • Videos
  • Articles
  • Shop
  • Clinics
  • Contact
  • Certificates

About Us

  • About Us
  • Foundation
  • Legacy of Vaidya R. B. Gogate
  • Dr. Anagha Gogate
  • Awards & Accolades
  • Competition awards
  • Special thanks
  • Books & Research
  • Our History
  • Trustees & Team

From the Foundation

  • Contact
  • Certificates

Connect

© 2026 Vaidya Gogate Memorial Foundation. All rights reserved.

PrivacyTermsShippingReturnsRefundCancellationFAQTrack a shipment

Developed by Capture Visual Studios

Home/Articles
Ayurveda4 Nov 2026

आयुर्वेद आऊटडेटेड ? मुळीच नाही .5

Published by Vaidya Gogate Memorial Foundation

Share

FacebookXLinkedInWhatsAppTelegramEmail

हेवी मेटल्स व आयुर्वेद कालानुसार चिकित्सेच्या उपक्रमात बदल होत असतात हे मी मागेच सांगितले आहे.मेटल्स , रत्ने , माणके ही आयुर्वेद शास्त्रात रसशास्त्र या शाखेमध्ये नंतर आली. ही औषधी खालील कारणांमुळे व्यवहारात आली. काढे, चूर्णांपेक्षा ती घेण्यास सोपी , चवीला बरी ,मात्रा थोडी ,खराब होण्याकडे प्रवृत्ती नाही, उपलब्धता मुबलक व आयडेंटिफिकेशनला अडचण नसलेली आहेत .पण ती वापरताना त्याची शुद्धी डिटॉक्सिफिकेशन अतिशय महत्त्वाचे. आयुर्वेदाला ठाऊक होते की ही मेटल शरीरात तशीच म्हणजे अशुद्ध स्वरूपात गेली तर मानवाला धोका पोहोचू शकतो. ती मानवी शरीरात अशुद्ध स्वरूपात गेली तर काय काय लक्षणे निर्माण होतात हेही स्पष्टपणे लिहून ठेवले आहे. थोडक्यात त्याची टॉक्सीसिटी लिहिली आहे. आपण एक दोन उदाहरणे पाहू. अशुद्ध पारा पोटात गेला तर त्वचेचे रोग, भूक नाहीशी होणे, अंगाची आग होणे, अन्नाला चव न लागणे व मरणही संभवते. थोडक्यात तो प्रथम व्हॅस्क्युलर सिस्टिम वर टॉक्सिसिटी दाखवतो, यकृताला बिघडवतो. अशुद्ध तांबे; भ्रम, मूर्च्छा,घामाचे प्रमाण वाढणे, ओकारी, चव न लागणे, सर्वांग दाह व चिडचिडेपणा निर्माण करतो. येथेही त्याचा परिणाम व्हॅसक्युलर ( यात यकृत आलेच ) मस्तुलुंग व मूत्र संस्थेवर परिणाम झालेला दिसतो. असे असतानाही आपण यांचे प्रयोग उंदरांवर, सशांवर करतो.या प्राण्यांमध्ये ओकारी , अन्न न खाणे, घाम येणे, चिडचिडेपणा ही लक्षणे व्यक्त स्वरूपात दिसतील. पण हे न बोलणारे प्राणी भ्रम , अंगाची आग, अन्नाला चव न लागणे ही लक्षणे कशी व्यक्त करणार ? ही सर्व लक्षणे टॉक्सीसिटी सुरू होताच दिसू लागतात. आपण नंतर हे प्राणी कापून त्यांचे परिणाम मूत्रपिंड, यकृत, वृक्क , बोनमॅरो , ब्रेन वगैरे वर काय झाले आहे हे पाहतो. आयुर्वेदाने अनुमानाने लक्षणांवरून कोणत्या अवयवावर टॉक्सिक लक्षणे निर्माण होतात हे सांगितले. आता आपण हिस्टोपॅथोलॉजीकल परीक्षणणाने मूत्र व रक्ताच्या परीक्षणावरून शरीरात डेमॉन्स्ट्रेबल काय घडले हे दृक पुराव्याने दाखवतो. सूक्ष्म इंद्रियांनी एखादा विषय समजावून घेण्यास आयुर्वेदाचा विरोध नाहीच नाही. अशी ही अशुद्ध मेटल्स , रत्ने , माणके यांची शुद्धी गोमूत्र, ताक, दूध यासारख्या किंवा वनस्पतींच्या काढ्याच्या द्वारे करण्यास सांगितली आहेत आणि अशी शुद्ध झालेली मेटल्स औषधी कारणासाठी वापरावी असा आयुर्वेदाचा दंडक आहे. ती निर्विषिकरणाची ( डिटॉक्सीकेशन ) प्रक्रिया आहे की ज्यामुळे मानवावर दुष्परिणाम होणार नाहीत.औषधी करणाऱ्याने किंवा वैद्यांनी ग्रंथात सांगितल्याप्रमाणे मेटल्सची शुद्धी केली नाही व त्या औषधाचा टॉक्सिक परिणाम दिसला तर तो दोष आयुर्वेदाचा नाही. ही द्रव्ये शुद्धीस घेण्यासाठी ती कमीत कमी व जास्तीत जास्त काय प्रमाणात घ्यावी ज्यामुळे शुद्धी तर उत्तम होईलच पण शुद्धी करताना अडचण होणार नाही असेही अनुभवावरून स्पष्ट मांडले आहे. काही वनस्पतीज औषधांच्या बाबतीत सुद्धा अशी शुद्धी अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांच्या ॲडव्हर्स टॉक्सिक रिअँक्शन्स दिसत नाही. संजीवनी मध्ये बिब्बा वापरताना तो आधी दुधात शिजवून घ्यावा. लशुणादिवटी मध्ये लसुन वापरताना त्याची दह्यात किंवा ताकात शुद्धि करून घ्यावी. तुळशीचा स्वरस वापरताना ती मंजिऱ्या आलेली असता कामा नये. माका शक्यतो निळा म्हणजे भुंग्याच्या रंगाची फुले असलेला वापरला पाहिजे.खरंतर आयुर्वेदाने कोणतेही औषध शास्त्रीय पद्धतीने करून शास्त्रीय पद्धतीने वापरले असता ते तो रोग बरा करील व इतर दुसऱ्या रोगाला, लक्षणाला उत्पन्न करणार नाही याची काळजी घेतली आहे. हल्ली रुग्ण एकाच वेळी अनेक प्रकारची औषधे घेत असतात. या औषधांचा एकमेकास पूरक उपयोग होतो का विपरीत हे खरंच कुणास ठाऊक नाही.आपण एक उदाहरण घेऊ. एखाद्या रुग्णाने जेंटामायसीन घेण्याआधी ताकद येण्यासाठी पारद गंधक घातलेला कल्प घेतला असेल आणि नंतर त्याला नेफरोटॉक्सिसिटी झाली तर ती जेंटामायसीनने झाली की पारा गंधकाच्या कल्पामुळे ? यापैकी एकच घेतले असते तर झाली असती का? का दोन्ही औषधांच्या एकत्रीकरणाने झाली? व्यवहारात खापर मात्र आयुर्वेदीय औषधांवर फोडले जाते. जेंटामायसीन तयार करणारी कंपनी औषधाच्या लिटरेचर मध्ये हे औषध काही लोकांच्या मध्ये नेफरोटॉक्सिक ठरू शकेल असे लिहून स्वतःच्या जबाबदारीतून मुक्त झालेली असते. बरे जेंटामायसीन सर्वांनाच नेफरोटॉक्सिक होते असे नाही. मग हा नियम शुद्ध पारा गंधक, तांबे यांना का लावू नये ?पण आयुर्वेदाने शुद्धी अशी सांगितली आहे की ज्यामुळे असे काही घडू नये. सध्याच्या पद्धतीने काही औषधांच्या वर घ्यावयाच्या ट्रायल्स या रोग कृत्रिमरीत्या निर्माण करून घेतल्या जातात. आयुर्वेदाने रोग प्रामुख्याने दोन कारणांमुळे होतात- निज व आगंतु. इन्ड्युस रोग हे विष ,विषाणू ,कृमी ,अग्नी , अभिघात या कारणाने घडतात. निजरोग आपल्या आहार विहाराच्या वैषम्यातून घडतात. कृत्रिम पद्धतीने व्याधी निर्माण करून त्यावर औषधांच्या ट्रायल्स घेणे कितपत यशस्वी होईल ठाऊक नाही. चंद्रकला हे तापावरील औषध. ते दिल्यावर ताप कमी होतो पण कृत्रिमरीत्या ताप निर्माण करून तेथे दिले तर उपयोगी ठरले नाही. त्रिभुवन कीर्ती बाबतीतही तसेच आढळले. त्यात ॲण्टीपायरेटिक गुणधर्म सापडले नाहीत. आवळा व हळद हे प्रमेहा वरचे औषध. ते प्राण्यातील इन्ड्युस डायबिटीस मध्ये काम करीत नाही पण माणसांमध्ये करते. येथे प्रयोग करताना अजून अडचणी येतात. प्रयोग करावयाच्या उंदरांना जे प्रमाणीकृत खाद्य दिले जाते त्यात ग्लुकोज असते. आणि आहार घेतल्यावर उंदरांनी झोपू नये ते आमच्या हातात नव्हते. माणूस व उंदीर यांचा जागेपणा चा काळ (निसर्गतः ) विरोधी होता.त्याचा एकूण व्यायाम किती होता हे आम्हाला मोजता आले नाही.यातून शास्त्रज्ञ मार्ग शोधतीलच.आम्ही पण शोधू. पण आयुर्वेदिक औषधांच्या ट्रायल्स साठी सध्याची मॉडेल्स कितपत उपयोगी पडतील याबद्दल शंका वाटते.

Related articles