Vaidya Gogate Memorial Foundation
Vaidya Gogate
Memorial Foundation
About Us
Events
Gallery
Videos
Articles
Shop
Clinics
Contact
Certificates
Legal
Signed out
Vaidya Gogate Memorial Foundation

Vaidya Gogate

Memorial Foundation

Ayurveda education, publications and clinical care.

102, Ramprasad Chambers, 368/1, Jawaharlal Nehru Rd, near Kirad Hospital, above Shraddha Medicals, New Nana Peth, Pune, Maharashtra 411002

Clinic hours: Monday–Thursday, 6:00 PM–10:00 PM

care@vaidyagogate.org093737 92952

Explore

  • About Us
  • Events
  • Gallery
  • Videos
  • Articles
  • Shop
  • Clinics
  • Contact
  • Certificates

About Us

  • About Us
  • Foundation
  • Legacy of Vaidya R. B. Gogate
  • Dr. Anagha Gogate
  • Awards & Accolades
  • Competition awards
  • Special thanks
  • Books & Research
  • Our History
  • Trustees & Team

From the Foundation

  • Contact
  • Certificates

Connect

© 2026 Vaidya Gogate Memorial Foundation. All rights reserved.

PrivacyTermsShippingReturnsRefundCancellationFAQTrack a shipment

Developed by Capture Visual Studios

Home/Articles
Ayurveda4 Nov 2026

स्वाइन फ्लू (H1N1)- नवीन त-हेचा फ्लू सात दिवसांचा संततज्वर

Published by Vaidya Gogate Memorial Foundation

Share

FacebookXLinkedInWhatsAppTelegramEmail

हा एक नेहमीच्या सात दिवसाच्या संततज्वराचा (इन्फ्लूएन्झाचा) प्रकार आहे आणि म्हणून नेहमीच्या इन्फ्लूएन्झामधील लक्षणेही याही रोगामध्ये सापडतात. नेहमीच्या वातावरणीय ‘फ्लू’ मध्ये व या प्रकारच्या ‘फ्लू’ मध्ये फरक एवढाच की, याचा प्रसार खूप तीव्रतेने होतो. हा प्रसार श्वास मार्गातून होतो असे जरी खरे असले तरी सुध्दा एखाद्या ठिकाणी हा पिडीत रुग्ण शिंकला असेल आणि त्या ठिकाणी प्राकृत माणसाचा हात लागला व तो त्याने चुकुन स्वतःच्या नाकाला,डोळ्याला, तोंडाला लावला तरी सुध्दा त्याला हा रोग संभवतो. या व्हायरस चा शोध अमेरिकेमध्ये एप्रिल २००९ मध्ये लागला. त्याच वेळी याच प्रकारच्या ‘फ्लू’ ने आजारी माणसे मेक्सिको व कॅनडातही आढळली. या नवीन फ्लूची लागण झाल्यानंतर या रुग्णाची रक्ताची तपासणी केली त्यावेळी त्यांना एक नवाच व्हायरस सापडला. हा व्हायरस ज्या व्हायरस मुळे डुकरांना ‘फ्लू’ होतो त्यासारखा होता म्हणून त्याला शास्त्रज्ञांनी Swine flu असे नाव ठेवले पण पुढे अधिक संशॊधनात हा व्हायरस अगदी नवीनच असल्याचे आढळले व त्याला नाव दिले Novel H1N1 Flu. हा व्हायरस डुकरांना होणा-या फ्लुचे दोन Gene , पक्षांना होणा-या फ्लूचा एक Gene व माणसांना होणा-या फ्लुचा एक Gene अशा चार जिन्सचा झालेला आहे. या फ्लुमध्ये नेहमेच्याच फ्लुची ताप, खोकला, चोंदलेले नाक , अंगमर्द,शिरःशूल, थंडी वाजणे व प्रचंड थकवा येणे ही लक्षणे सापडतात. सामान्यतः ५ वर्षांखालील व ६० वर्षांवरील व्यक्तींना याची लागण झपाट्याने होते. लहान मुलांमध्ये खालील लक्षणे निर्माण होणे हे व्याधीने गंभीर स्वरूप धारण केल्याचे लक्षण मानले जाते. श्वासकष्टता व श्वास वेग वृध्दि, त्वचेचा रंग निळसर हिरवा होणे, अन्नावरची इच्छा जाणे, न थांबणारी उलटी, चालता न येण, समज नाहीशी होण, बेचैनी, उपचारानंतर ही लक्षणे कमी होतात पण ताप व खोकला खूप दिवस चालू राहतो. वृध्दांमध्ये खालील लक्षणे रिष्ट मानली जातात. श्वास घेण्यास अडथळा किंवा श्वास उथळ होणे, पोटावर व छातीवर साधा स्पर्शही सहन न होणे, चक्कर येणे, गोंधळल्यासारखी स्थिती येणे, सतत उलट्या उपचारानंतर ही लक्षणे जातात पण त्यानंतर खूप दिवस ताप व खोकला येतच राहतो. काही रुग्णांमध्ये उलट्यांच्या जोडीला जुलाबही झालेले आढळतात तुरळक मृत्यूही झाल्याची नोंद आहे. ज्या व्यक्तीला या रोगाची लागण होते ती व्यक्ती या फ्लूची लागण प्रत्यक्षतः रोग लक्षणे उत्पन्न होण्याच्या आदल्या दिवसापासून ते त्याचा फ्लु असे पर्यंत म्हणजे सात दिवस तो दुस-यांना या रोगाची बाधा करू शकतो, म्हणून या रुग्णाने – शाळा,कॉलेज,ऑफिस,सिनेमागृहे याठीकाणी जाणे टाळावे. त्याने केवळ औषधोपचारासाठीच बाहेर पडावे. यावर अद्याप औषध किंवा लस सापडली नाही. रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी सध्या Antiviral औषधे वापरतात. यामध्ये Timiflu व Relenza. (Oseltamivir व Zunamivir) . ही ऍण्टीव्हायरल उत्तम काम करतात. असे आढळले आहे. ती गोळ्या व द्रव स्वरुपात उपलब्ध आहेत. आयुर्वेदाच्या दृष्टीने खालील दोन सूत्रांचाही विचार करावयास हरकत नाही.

संततज्वर- सप्ताहं वा दशाहं वा द्वादशाहमथापि वा । सन्तत्या योऽविसर्गो स्यात्सन्ततः स निगद्यते। सु.उ. २९/६९

पित्तजज्वर- वेगः स्तीक्ष्णैऽतिसारश्च निद्राल्पत्वं यथा वमि । कण्ठौष्ठ मुखनासानां पाकः स्वेदश्च जायते ॥ प्रतापः कटुता वक्त्रे मूर्च्छा दाहो मदः स्तृषा । पीत विण्मूत्र नेत्रत्वं पैतिके भ्रमः । सु. उ. ३९/४२

संततज्वर- पित्तानुबंधी असे निदान व्हावे थोडासा वातानुबंधही आहे. या रोगात गुळवेल उपयोगी ठरावी. वैद्य रा.ब.गोगटे GFAM(BOM) , AVP (Surgery), निवृत्त प्राध्यापक व आयुर्वेदिक चिकित्सक, पुणे.

Please note: The article(s) were written by Dr. R. B. Gogate during 1961-2010. The fundamental relevance of these holds true even today, yet the readers/viewers should consider the timeline and the limited availability of the resources which might conflict with the recent advancements.

Related articles