Vaidya Gogate Memorial Foundation
Vaidya Gogate
Memorial Foundation
About Us
Events
Gallery
Videos
Articles
Shop
Clinics
Contact
Certificates
Legal
Signed out
Vaidya Gogate Memorial Foundation

Vaidya Gogate

Memorial Foundation

Ayurveda education, publications and clinical care.

102, Ramprasad Chambers, 368/1, Jawaharlal Nehru Rd, near Kirad Hospital, above Shraddha Medicals, New Nana Peth, Pune, Maharashtra 411002

Clinic hours: Monday–Thursday, 6:00 PM–10:00 PM

care@vaidyagogate.org093737 92952

Explore

  • About Us
  • Events
  • Gallery
  • Videos
  • Articles
  • Shop
  • Clinics
  • Contact
  • Certificates

About Us

  • About Us
  • Foundation
  • Legacy of Vaidya R. B. Gogate
  • Dr. Anagha Gogate
  • Awards & Accolades
  • Competition awards
  • Special thanks
  • Books & Research
  • Our History
  • Trustees & Team

From the Foundation

  • Contact
  • Certificates

Connect

© 2026 Vaidya Gogate Memorial Foundation. All rights reserved.

PrivacyTermsShippingReturnsRefundCancellationFAQTrack a shipment

Developed by Capture Visual Studios

Home/Articles
Ayurveda4 Nov 2026

HIV

Published by Vaidya Gogate Memorial Foundation

Share

FacebookXLinkedInWhatsAppTelegramEmail

आता जो जनपदोध्वंस होऊ घातला आहे तो एड्‍सचा! खरं म्हणजे हा दोन पाय-यातून जाणारा जनपदोध्वंस आहे. HIV विषाणूने दूषित झालेल्या असंख्य प्रत्यक्ष एड्‍सच्या लक्षणांनी मृत्यूला कवटाळणा-या असंख्य लोकांचा. HIV- Human Immunodeficiency Virus याचा माणसात काय कारणांनी प्रथम प्रवेश झाला याची चर्चा यापूर्वी आलीच आहे. पण (HIV) विषाणूचा संसर्ग ज्या माणसास किंवा स्रीस झाला आहे ती व्यक्ती यांचा फैलाव – जननेंद्रियामार्फत, गुदामार्फत दुस-या व्यक्तीस करते; किंवा (HIV) पीडित माणसाच्या रक्ताचा संपर्क – ज्याला संसर्ग झालेला नाही अशा माणसाला इंजेक्शनद्वारे, जखमांद्वारे अथवा रक्तदानातून झाला तर त्यासही हा रोग होतो. (HIV) ची लागण एखाद्या स्त्रीला दिवस राहण्यापूर्वीच झाली असेल तर काही वेळा ते बाळ (HIV) चा संसर्ग घेऊन येते किंवा प्रसवाच्या वेळी (HIV) पीडत योनीच्या संसर्गातून लागण घेते. येथे रोगोत्पत्ती व्याभिचारातून झालेली नसते. आता या बाळास (HIV) पासून वाचविणे शक्य झाले आहे. खरा प्रसार आहे तो प्रामुख्याने जननेंद्रिय- योनी व गुद यांच्यातून अधिक प्रमाणात होतो. व त्याचेही प्रमाण फिरंग व उपदंश या व्याधीनी पीडित रुग्णात अधिक सापडते. अशी ही संसर्ग पावलेली व्यक्ती संसर्ग झाल्यावर ८ ते १० वर्षे इतर सामन्य माणसासारखेच जीवन जगत असते. पण ती हळूहळू प्रतिकार अक्षम होत असते. क्वचित फ्लूसारखा ताप येणे, अंगावर पुरळ येणे, वारंवार तोंड येणे, नागीण होणे या सारख्या गोष्टी मधून मधून होत असतात आणि काहीतरी आकस्मिक कारणाने रक्त तपासले जाते आणि ती व्यक्ती (HIV) पीडित आहे असे समजते. पण ही गोष्ट लक्षात येण्यापूर्वी अनवधानाने “ या मानवी बॉंबने “ अनेकांना (HIV) चा संसर्ग दिलेली असतो. अशा त-हेचा संसर्ग घेतलेल्या अनेक व्यक्ती सध्या जगात आहेत. खरण्च , सध्या (HIV) ची लक्षण मुक्त जनपदोध्वंस चालू आहे. संसर्ग पावलेली व्यक्ती मानवी बॉंब आहे. आता तर त्याचे स्वरूप (HIV) राहिले नसून ते (AIDS) मध्ये रूपांतरीत झाले आहे. ८ ते १० वर्षांच्या कालावधीमध्ये हळूहळू (HIV) संसर्गी लोकांची प्रतिकारशक्ती संपुष्टात आलेली असते. त्यांच्यामधे महिन्यापेक्षा अधिक काळ ताप राहणे, जुलाब होणे, बलक्षय, मांसक्षय आणि शेवटी मृत्यूत परिणती असे या एड्‍सचे संलक्षण निर्माण होते. व्याधी- प्रतिकारशक्ती नष्ट झाल्यामुळे इतर व्याधींचे जंतू- विषाणू शरीरावर हल्ला करतात. येथे एड्‍सचा लक्षणसमुच्चय निर्माण होतो त्यावर नेहमीची औषधे उपयोगी पडतातच असे नाहे. आता याही जनपदोध्वंसाला सुरुवात झाली असून जगातील लाखो लोक या लक्षणांनी पीडित आहेत. एड्‍स निर्माण झाल्यानंतर काख, मान,जंघा प्रदेशातील गाठी मोठ्या होणे, गुदपाक,मुखपाक वगैरे लक्षणे तर अधिकच तीव्र होतात.

Staging in AIDS from modern books- AIDS Group 1 –Acute infection - Fever, lymphadenopathy, G.I. tract symptoms (Abdominal pain, loose motions) rash on the skin, jaundice, aseptic meningitis or meningo encephalitis. Muscle skeletal complications. (IIlness self limiting). AIDS Group 2 – Asymptomatic – but occasionally moderately enlarged nodes in axila Anaemia, Leucopenia, Thrombocytopenia. AIDS Group 3 – Enlargement of all lymph glands splenomegaly, unexplained fatigue, fever , night swetas, weight loss diarrhoea. AIDS Group 4- Constitutional persistent fever > 1month, Neurological – Dementia. Change in behavioural cognitive and motor functions, Myelopathy – Subacute combined degeneration peripheral neuropathy. Sensory type, Acute/chronic meningitis, Cerebral haemorrhage, secondary infection. Finally death due to loss of immune system. (Ref. from modern books)

म्हणजे येथे (HIV) चा संसर्ग अणूस्वरूप असतो व त्याचेच रूपांतर पुढे एड्‍स या महाभयंकर लक्षणसमुच्चयात होते. अणुर्ही प्रथमं भूत्वा रोगः पश्चाद्विर्धते । सजातमूलोमुष्णाति बलं आयुश्च दुर्मते ॥ ११/५८ आयुर्वेदात अशा त-हेची अवस्था राजयक्ष्मा, प्रमेह, ओजक्षय यामध्ये येते असे त्या त्या व्याधींची वर्णने पहिल्यानंतर दिसते. (HIV/AIDS) याचे वर्णन आयुर्वेदात आहे की नाही असा विचार करत बसण्यापेक्षा घडणा-या घटनांवरून चिकित्सा करणे हे योग्य ठरते- कर्मावरून- शरीरात कोणते द्रव्य गेले असले पाहिजे आणि त्याने कसे कसे उपद्‍व्याप केले असले पाहिजेत याचे अनुमान करता येते. व त्याप्रमाणे आयुर्वेदातील तत्त्वांच्या चिकित्सा आधारे चिकित्सा करता येते. येथे चिकित्सा करत असताना शोष, राजयक्ष्मा, उपदंश व प्रमेह व्याधी त्याची लक्षणे चिकित्सा व शरीरावर होणारे परिणाम यांचा विचार करून (HIV) चे उपचार, औषधीद्रव्य व आहारविहार पथ्यापथ्यादि योजले आहेत. वरील व्याधी ओजक्षयाला कारणीभूत होतात म्हणून येथे ओजक्षयाचा विचार आणि कारणेही विचारात घेतली आहेत. प्रत्येक रोगास नाव देताच येते असे नाही. प्रत्येक लक्षण हा सुध्दा रोग असू शकतो. अगदी असाध्य अशा व्याधींमध्ये सुध्दा जोपर्यंत नाकासमोर धरलेले सूत हालते आहे तोपर्यंत चिकित्सा करावी असे आयुर्वेद सांगतो. बृह्त्‍त्रयी आणि लघुत्रयीनंतर आयुर्वेद शास्त्रास भर पडली नाही. परीक्षण आणि निरीक्षण वरवरचे झाले भर पडली ती गाईड्‍सची. आपल्या ऋषी मुनिवर्गाने आपली चक्षुरिंद्रिये, कर्णेंद्रिये,स्पर्शेंद्रिये, प्रत्यक्ष अनुभवांनी मिळवलेले ज्ञान त्यावरून मांडलेले त्रिकालाबाधित सत्य आपल्या शिष्यांना दिले. काही शिष्यांनी नवीन पिढीत मेंदूच्या कॉम्प्यूटरमध्ये उत्पन्न होणा-या उणीवा लक्षात ठेवून ते ग्रंथस्वरूप केले. माणसाच्या इंद्रियांना मर्यादा असतात हे ऋषीमुनींना माहित होते; आणि म्हणून त्यांनी त्यांच्यापेक्षा अधिक काही असू शकते असे नमूद केले.

नशक्य चक्षुषा द्रष्टं इहं सूक्ष्मतमो विभुः । दृषते ज्ञान चक्षुर्भिस्तपश्चक्षुर्भिरेव ॥ सु.शा.

आणि म्हणूनच आयुर्वेदाने रुग्णाचे निदान आणि चिकित्सा पूर्णत्वास नेण्यासाठी इतर शास्त्रांचे ज्ञान अवगत करून घेण्यास सांगितले आहे. एक शास्त्रंमधीयानो न विद्याच्छास्त्र निश्चयम्‍। तस्माद्‍ बहुमतः शास्त्रं विजानियात् चिकित्सकः ॥ सु.सू.४/७

सध्या चक्षुरिरेंद्रियाची व्याप्ती: microscope, ultramicroscope, CT scan, angiography,scopy यांनी वाढली आहे. कर्णेंद्रियाची व्याप्ती (Stethoscope) वगैरेंनी वाढली आहे. ती अतींद्रियच आहेत. त्याचा वापर आपण करणारच आहोत. ऋषिमुनींना जंतू, कृमी, राक्षस हे ज्ञात होते. काही कृमी हे अतिशय बारीक असल्यामुळे डोळ्यांना दिसत नाही. “ केचित्‍ सूक्ष्मः अदर्शनः ” या सूत्राने सांगितले आहे. आता ते कृमी ज्ञात झाले. एड्‍स निर्माण करणा-या (HIV) विषाणूचे ज्ञान झाले. पुढे उत्पन्न होणा-या घटनांवरून – लक्षणांवरून त्यांचे कर्तृत्व समजले. म्हणजेच एड्‍सचे पूर्वरूप HIV विषाणूंचे शरीरातील वास्तव्य हेच समजायचे नाही का? आणि म्हणूनच (HIV) ची शरीरातील चाहूल लगताच त्यावर चिकित्सा करणे आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. अर्वाचीन शास्त्राचा चिकित्सेबाबत दृष्टिकोन सुरुवातीच्या अवस्थेतील वेगळा आहे.

HIV- Human Immunodeficiency Virus

Please note: The article(s) were written by Dr. R. B. Gogate during 1961-2010. The fundamental relevance of these holds true even today, yet the readers/viewers should consider the timeline and the limited availability of the resources which might conflict with the recent advancements.

Related articles