Vaidya Gogate Memorial Foundation
Vaidya Gogate
Memorial Foundation
About Us
Events
Gallery
Videos
Articles
Shop
Clinics
Contact
Certificates
Legal
Signed out
Vaidya Gogate Memorial Foundation

Vaidya Gogate

Memorial Foundation

Ayurveda education, publications and clinical care.

102, Ramprasad Chambers, 368/1, Jawaharlal Nehru Rd, near Kirad Hospital, above Shraddha Medicals, New Nana Peth, Pune, Maharashtra 411002

Clinic hours: Monday–Thursday, 6:00 PM–10:00 PM

care@vaidyagogate.org093737 92952

Explore

  • About Us
  • Events
  • Gallery
  • Videos
  • Articles
  • Shop
  • Clinics
  • Contact
  • Certificates

About Us

  • About Us
  • Foundation
  • Legacy of Vaidya R. B. Gogate
  • Dr. Anagha Gogate
  • Awards & Accolades
  • Competition awards
  • Special thanks
  • Books & Research
  • Our History
  • Trustees & Team

From the Foundation

  • Contact
  • Certificates

Connect

© 2026 Vaidya Gogate Memorial Foundation. All rights reserved.

PrivacyTermsShippingReturnsRefundCancellationFAQTrack a shipment

Developed by Capture Visual Studios

Home/Articles
Ayurveda4 Nov 2026

शल्य- शालाक्यतंत्रीय शूल

Published by Vaidya Gogate Memorial Foundation

Share

FacebookXLinkedInWhatsAppTelegramEmail

यत्‍मनोशरीरविघातकरं तत्‍ शल्यम्। सुखसंज्ञकं आरोग्यम्।

जे शरीर आणि मन या दोघांनाही बाधा करते. ते शल्य होय. शल्य याचा अर्थ टोचणी, बोचणी, वेदना या अर्थी असेल.वेदना या सुखकर या दुखःकर असू शकतात. दाबल्यावर शूलही असतो, तर काही वेळा बरेही वाटते. उष्णतेने शूल निर्माण होतो तर काही वेळा उष्णता सुखकरही असते.

Pain is an unpleasant sensory and emotional experience associated with actual or potential tissue damaage or described in such a type of damage. स्पर्शज्ञान हे वायूचे शंकातीत कर्म आहे. सुखदुःखानि ज्ञानम्। च.नि. ८/३ मनोवह स्रोतस आहे हे संज्ञावह स्रोतस आहे. शूल, रुजेच्या बाबतीत दोन महत्त्वाच्या गोष्टी आयुर्वेदाने मांडल्या आहेत. रुजा:- शूलमज्जास्थिकुपितस्य अनिलस्य च हे एक लक्षण आहे. (च.चि. २८/३३).

आयुर्वेदामध्ये वेदना या अर्थाने अनेक शब्दप्रयोग आले आहेत. पण ज्यांचा नेमका अर्थ काढता येईल ,असे तीन शब्द आहेत- शूल, वेदना, रुजा . शूल:- यामध्ये शरीराच्या कोणत्याही भागात तात्पुरत्या कारणाने घडलेली असते. शरीरधातुंचा नाश न समजण्याइतका असणे व तेथे काही वेळा कोणतेही उपचार न करता बरे वाटते. उदा. स्नेहन, स्वेदन, मर्दन, बंध, व्यध व अग्निकर्माने तो शूल शांत होतो. शिरःशूल, दंतशूल, कर्णशूल इ. त्याची उदाहरणे आहेत. वाताच्या ८० विकारांपैकी ४७ विकारांमध्ये शूल हे प्रमुख लक्षण असते. संग्रहकारांनी शूल रोगावर एकूण ३०५ वनस्पती सांगितल्या आहेत. त्यापैकी २२ वनस्पती ह्या वातज शूलामधील आहेत. (वातरोगातील आहेत). वेदना किंवा रुजा यासाठी एकही औषध दिलेले नाही. कारण वेदना किंवा रुजा यासाठी एकही औषध दिलेले नाही. कारण वेदना जेथे निर्माण होतात, तेथे प्रत्येक ठिकाणी संप्राप्ति वेगळी आहे व रुजा अशी आहे, की जेथे मज्जा- अस्थिस्थित चेतनेचा नाश झालेला असतो. चरकांनी वेदना स्थापन आणि सुश्रुतांनी लोध्रादि गण वेदनास्थापन सांगितला आहे. वेदनाच्युति= मूर्च्छा वेदना- सामन्यतः शरीरस्थ अवयवांमध्ये धातूंमध्ये सम्प्राति घडत असते. त्यावेळी उत्पन्न होतांना तेथे धातुंना , अवयवांना प्रत्यक्ष इजा झालेली असते. घडणारी सम्प्राप्ति थांबली, की वेदना थांबतात. उदाहरणार्थ- व्रणशोथ (पच्यमानावस्थेचे पक्वावस्थेत रुपांतर). प्रसूति- सुरवातीस शूल असतो. प्रसूतिचा सम्प्राप्ति चालू असताना वेदना असतात व प्रसूति पूर्ण झाली, की वेदना थांबतात. कर्णविद्रधी- आमावस्था – शूल असतो. पच्यमानावस्था – वेदना, भिन्नताज्ञ वेदनाशांती. परिणामशूल- आधी शूल असतो, पण सम्प्राप्तिभंग केला नाही, तर त्याचे रुपांतर तीव्र वेदामय व्रणात रुपांतर होते व तीव्र वेदना निर्माण होतात. अश्मरी- वृक्कस्थ, गविनीस्थ, बस्तिस्थ असल्यास शूल मंद असतो. अश्मरी बाहेर पडण्याची सम्प्राप्ति सुरु झाल्याव्र वेदना असतात व अश्मरी पडून गेल्यावर त्या थांबतात. समजण्याचे दृष्टीने ही वरील उदाहरणे दिली. शूलापेक्षा वेदना या जास्त त्रासदायक असतात. सामान्यतः सम्प्राप्ति पूर्ण झाल्यानंतर बहुधा प्रकृतावस्था येते. रुजा- यामध्ये प्रत्यक्ष चेतनेला इजा पोहोचलेली असते. आयुर्वेदाने रुजाकर मर्मे सांगितली आहेत. ब-याच वेळा कायमची टोचणी राहणा-या रुजेस वैद्यप्रमादच कारणीभूत असतो. सम्प्राप्तिही कायमची दुरुस्त होण्यासारखी नसते. कूर्चशिर- शोफरुजाकर गुल्फमर्म- गुल्फ रुक्‍स्तम्भकृत्‍| रक्तज- अतिरक्तोद कोष्टुकशीर्ष – जानुमध्ये महारुजा वातकंटक- रुक्दाह . अर्वाचीन शास्त्रात याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे- classes of pain:- Nociceptive Inflammatory pain which is associated with tissue damage and infiltration of tissue cells. Pathological pain which is disease state by damage to the nervous system (Neuropathic pain).

शमत्येवं न चेत्शूलं स्निग्धस्विन्नस्य मोक्षयेत्‍। शूलासाठी रक्तमोक्ष व अग्निकर्म सांगितले आहे या लेखाच्या निमित्ताने विध्द व अग्निकर्म या शूलहर चिकित्सेत सप्तत्वचेचा बोध झाला. त्वक्‍ मांस सिरा स्नायु सन्ध्यास्थिस्थितोऽत्यग्ररुजि वायुः । सु,सू.१२/१० १२३४५६ त्वग्मांससंश्रितो वायुः त्वग्दाहेनैव शाम्यति । मांसदग्धे हि शाम्यति सिरास्नाय्वस्थिसंधिनः ॥ सु.सू. १२/७ प्रवाहिकायां शूलिन्यां .................। श्रोणिप्रतिसमन्ताद्‍ द्‍व्यंगुले । सु.शा. ८/ १७

यावरचे आवरण त्वचा : अर्वाचीन शास्त्राप्रमाणे तेथे संज्ञावाहक सिरा असतात. ततः सिरा देहेऽपि मतिमान्‍ किर्तीतं सदा । सु. उ. १७/९४ न केवलं सिरा मोक्षयेद्‍ दहेद्वा । वातवाहिन्या ह्या सर्व शरीरभर पसरलेल्या असतात. तासां वातवाहिन्याः दशसिरा भवन्ति । अतः सर्ववहाः स्मृताः ॥ सु.शा. ७/१७

ह्या चेतन्या सर्व शरीरव्यापी आहेत. त्वचा, मांस, स्नायु, सिरा, संधि, अस्थि व महास्रोतसातील अवयव या सात ठिकाणचा शूल ज्या अर्थी विध्द व अग्निकर्माने थांबतो, (अर्थात खोलीसापेक्ष ) त्याअर्थी आयुर्वेदाला अपेक्षित सप्तत्वचा ह्या त्यावरील आवरण असलेच पाहिजे. ह्या निमित्ताने सप्तत्वचांचा पक्का खुलासा व्हावा. वरच्या सूत्रामध्ये आंत्रांना वातवाहिन्यांचा पुरवठा असतो का? असा प्रश्न उद्‍भवतो. विध्दचिकित्सेमध्ये ’ प्रवाहिकायां शूलिन्यां व्यधेत्‍| ’ असे म्हटले आहे. त्याचा अर्थ असा की, आंत्रांना वातवाही सिरांचा पुरवठा आहे. थोडक्यात सप्तत्वचा म्हणजे त्वचा,मांस,स्नायू,सिरा, अस्थि व अन्नवह स्रोतसाचे आवरण होत.

PAIN RECEPTOR:- Pain receptors are found on free nerve endings located in many tissues throughout the body. This includes skin, muscles, joints, connective tissue and internal organ. pain receptors are activated in response to a painful stimulus usually involving tissue damage. Once activated, pain receptors release chemicals called Neurotransmitters that send information about the pain stimulus along the nerve to the spinal cord and brain.

त्वग्मांससंश्रितो वायुः त्वग्दाहेनै व शाम्यति । मांसदग्धे शाम्यति सिरास्नाय्वस्थि सन्धिजः ॥ टिका सु.सू.१२/७ इहं तु सिरास्नाय्वस्तिसन्धिष्वपि न प्रतिसिध्दोऽपि ॥ टिका. वायव्यस्तु स्पर्शः स्पर्शेन्द्रियः सर्व चेष्टासमूहः सर्वशरीरस्पदनं लघुता च । सु.शा. १/१९ अव्यक्तो व्यक्तकर्मा । थोडक्यात आयुर्वेद शास्त्र आणि अर्वाचीन शास्त्र यांत समजुतीप्रमाणे कुठेही फरक नाही. विशेषतः वेदनांमध्ये वेगवेगळ्या छटा असतात. समजण्याच्या दृष्टीने काही गोष्टी मुद्दाम येथे मांडत आहे. १) एखाद्या ठिकाणी व्रणशोथ होत असेल, तर तेथे मज्जासंस्था लवकर पाक निर्माण करण्याचा प्रयत्न करते; पर्यायाने वेदना कमी करण्याचा प्रयत्न असतो. २) आपण एखादे काम सतत करत राहणे- धावणे, हसणे, पळणे, उड्या मारणे, एव्हढेच काय, पण संभोगसुध्दा- येथे थकव्याची संवेदना उत्पन्न होण्याच्या काही काळ उत्स्फुरता येते व हा काळ प्रत्येक माणसागणिक कमी –जास्त असतो. ३) सामान्यतः आतड्यांचे ठिकाणी ज्या चेतना वाहिन्या आहेत, त्या मंद वेदनावाही आहेत. ज्या ठिकाणी त्वरीत्‍ ऍक्शन घेण्याची गरज असते, तेथे त्या संज्ञेचे वहन स्पाइनल कॉर्ड, थॅलॅमसपर्यंत जाते व तेथूनच आज्ञा दिली जाते. डास चावल्यास लगेच हात हाण, चटका बसला तर लगेच हात पाण्यात घाल इ. मात्र जेव्हा आज्ञा सावकाश देवून व्यवच्छेद करायचा असेल, तेव्हा चेतनांचे संदेश मेंदूच्या कॉर्टेक्सकडे पाठवैले जातात. चेतनेचे दोन प्रकार असतात- १. सावरण २. निरावरण . निरावरणातून संदेशवहन दर मिनिटाला ७ मैल असते,तर सावरणातील संदेशाचा वेग सुमारे ७ ते ८३ मैल इतका असतो. संज्ञावहन हे चेतना एकटी करु शकत नाही. त्याआधी काही रसायने उपलब्ध व्हावी लागतात. चेतना या मनाला सुखाबारोबर दुःखाच्याही संवेदना निर्माण करतात. निरनिराळे (endorphins) निर्माण होतात. हा शरीरात तयार होणार पदार्थ असून, त्याची तुलना अहिफेनाशी होते. ही द्रव्ये शूलाची तीव्रता कमी करतात. सम्भोगाचे वेळी व दूध बाळाला पाजण्याच्या वेळी जो आनंद मिळतो, तो चेतासंस्थेने निर्माण केलेल्या (endorphins) मुळे होतो, ज्याची तुलना ऑक्सिटोनशी होऊ शकते.

संवेदना सुखदुःखादि ज्ञानम्। शे|क हा सामान्यतः दुःखदायक असतो. पण व्रणशोथाच्या पच्यमानावस्थेचे वेळी तो सुखकर ठरतो. एखाद्या ठिकाणी दाब दिला, तर तो दुःखकारक असतो, पण शूल असतांना तेथे केलेले मर्दन हे सुखकर ठरते. म्हणून - चेतना सुखदुःखकरम्। मेंदूची झीज भरून आणण्याकरीता न्युरोट्रॉपिक्स उत्पन्न होतात व ती मेंदूची सद्यःस्थिती कायम ठेवण्याचे व मजबूत करण्याचे कार्य करतात. गार गरम टोचणे, कंप अशा अनेक त-हेच्या संवेदना असतात व त्यांचे ग्रहण विविध एंझाइम्स व केमिकल्सतर्फे मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचविले जातात. यांना सेकंड मेसेंजर म्हणतात. उदा. ब्रॅडीकिनीन्स, प्रोस्टाग्लॅंडीन्स,हिस्टामाईन्स, सिरोटोनिन्स, पोटॅशियम इ. यामुळे एखादी व्यवस्था अकार्यक्षम झाली, तरी इतर व्यवस्था चालू राहतात. मज्जातंतूंकडून दुसरा संदेश देणारे एंडॉर्फिन्स असतात. ते शरीराला सुख देतात. हे संस्थेने क्लायटोरीस, शिस्न या ठिकाणी अधिक असतात. पण इतर ठिकाणीही असतात. या उत्पन्न होणा-या एंडॉर्फिन्सचा उपयोग कॅन्सर टाळण्याच्या दृष्टीने आहे.

सारांश- चेतना सुखदुःखादि संवेदना हे तंतोतंत खरे आहे. सेकंद मेसेंजर हे द्रव्यस्वरुप आग्नेय आहेत, असे म्हटले तर काय चूक आहे? जिज्ञासूंनी याचा जरूर विचार करावा.

Please note: The article(s) were written by Dr. R. B. Gogate during 1961-2010. The fundamental relevance of these holds true even today, yet the readers/viewers should consider the timeline and the limited availability of the resources which might conflict with the recent advancements.

Related articles