Vaidya Gogate Memorial Foundation
Vaidya Gogate
Memorial Foundation
About Us
Events
Gallery
Videos
Articles
Shop
Clinics
Contact
Certificates
Legal
Signed out
Vaidya Gogate Memorial Foundation

Vaidya Gogate

Memorial Foundation

Ayurveda education, publications and clinical care.

102, Ramprasad Chambers, 368/1, Jawaharlal Nehru Rd, near Kirad Hospital, above Shraddha Medicals, New Nana Peth, Pune, Maharashtra 411002

Clinic hours: Monday–Thursday, 6:00 PM–10:00 PM

care@vaidyagogate.org093737 92952

Explore

  • About Us
  • Events
  • Gallery
  • Videos
  • Articles
  • Shop
  • Clinics
  • Contact
  • Certificates

About Us

  • About Us
  • Foundation
  • Legacy of Vaidya R. B. Gogate
  • Dr. Anagha Gogate
  • Awards & Accolades
  • Competition awards
  • Special thanks
  • Books & Research
  • Our History
  • Trustees & Team

From the Foundation

  • Contact
  • Certificates

Connect

© 2026 Vaidya Gogate Memorial Foundation. All rights reserved.

PrivacyTermsShippingReturnsRefundCancellationFAQTrack a shipment

Developed by Capture Visual Studios

Home/Articles
Ayurveda4 Nov 2026

संधिवात

Published by Vaidya Gogate Memorial Foundation

Share

FacebookXLinkedInWhatsAppTelegramEmail

संधिवात म्हणजे संधिशूल असाच अर्थ अनेकवेळा केला जातो पण मला असं वाटतं की तो तसा मर्यादित न घेता वायूने अस्थि, मज्जा , व संधि हे ज्या ठिकाणी शरीरात एकत्र येतात त्याठिकाणी निर्माण केलेले उत्पात. या उत्पातात शूल हे लक्षण प्रमुख असते. हा उत्पन्न होणारा शूल अध्यस्थि सौषिर्य, बंधनात आलेले शैथिल्य, बंधनांचा नाश, मज्जा क्षीणता, या सारख्या वायू प्रकोपामुळे घटना घडतात. यात स्रंस,व्यध किंवा स्थानसंश्रयासारख्याही गोष्टी असतात. संधि म्हणजे ज्या ठिकाणी सिरा, स्नायू, अस्थि एकत्र येतात तो भाग असेही मर्माच्या संदर्भात आलेल्या वर्णानात सापडते. म्हणून केवळ संधि म्हणजे दोन किंवा अनेक अस्थिंचे एकत्र येणे असे न करता तत्‍ संबधांतील सर्व भाव पदार्थ असा घ्यावा. संधिवात हा व्याधि प्रभूत प्रमाणात सापडतो. वातव्याधि असल्याने कायम स्वरूपी बरे करण्याची हमी नसलेला पण प्रयत्न तर करून पाहू असा रुग्णाचा व वैद्याचा व्यावहारिक विचार. संधिवातातील प्रमुख लक्षण म्हणजे आकुंचन – प्रसरणादि क्रिया करताना होणा-या वेदना व त्यामुळे रोजच्या कामात आलेल्या मर्यादा, शोथ असतो पण दबणारा नसतो. संधिच्या हालचालीच्या वेळी काहीवेळा शब्द निर्माण करणारा अस त्याच थोडक्यात वर्णन करता येईल. वातपूर्णदृतिस्पर्शः शोथ संधिगतेऽनिलॆ। प्रसरणाकुत्र्चनयोः प्रवृतिश्च संव्र्दना ॥ च.चि. २८/३० सामान्यतः वायू खालील कारणानी प्रकुपित होतो. धातुक्षय (वार्धक्य,शोष) दुःख शय्यासन- वेडेवाकडे झोपण्याची किंवा बसण्याची सतत वेळ येणे, वेगसंधारण, अभिघात, मर्माघात व अभोजन. ज्या शरीरात किंवा शरीर भागात रुक्ष, लघु,शीत दारुण,खर, विषद व सुषिरकरण या गोष्टी आढळतात तेथे वात प्रकोप होण्याची शक्यता खूप असते. सामान्यतः स्निग्ध,गुरू,उष्ण, श्लक्ष्ण, मृदु,पिच्छिल व घन अशा शरीरात किंवा शरीर भागात वात प्रकोप होत नाही. किंबहुना वाताला पोषक अशा भागात वरील गुण औषधोपचारांनी, आहारविहारांनी, पथ्यापथ्यानि निर्माण करता आले तर वायुचे शमन होऊन रुग्णास उपशम मिळतो. म्हणून एकूणच वात व्याधी चिकित्सेत वरील गुणांनी युक्त असे बाह्य व अभ्यंतर इलाज केले जातात व आहारविहाराची योजना त्याच पध्दतीने केली जाते. देहेस्रोतांसि रिक्तानि पूरयित्वाऽनिलो बली । करोति विविधान्‍व्याधीन्‍सर्वाड्‍गैकाड्‍ग संश्रितम्‍॥ च.चि.अ.२८ अव्याहत गतिर्यस्य स्थानस्थः प्रकृतौ स्थितः वायुः स्यात्सोऽधिकं जिवेद्वित रोगः समा शतम्‍। चि.चि. २८/४ अस्थिक्षय म्हटला की स्रोतो रिक्तता आली. ती आली म्हणजे तेथे वायू धावणारच. संधि विकृतिमध्ये खालील सूत्रांचा विचार महत्त्वाचा. अस्थिक्षय लक्षणे- केशलोमनखश्मश्रुद्विज प्रपतनं श्रमः । ज्ञेयः अस्थिक्षये रूपं संधिशैथिल्यमेवच । च.सू.१७/७७ अस्थिक्षये अस्थिशूलं नख दन्तो भंगो रौक्षंच ॥ सु.सु. अस्थिगत व्याधी- अध्यस्थिदन्तौ दन्तास्थिभेद शूलं विवर्णता । केशलोम नखश्मश्रु दोषाश्चास्थि प्रदोषजः । च.सू. २८ मज्जास्रोतो दृष्टि लक्षणे- रुक्‍ पर्वणां भ्रमो मूर्च्छा दर्शनं तमसो मतः । अरूषांस्थूल मूलानां पर्वजानां च दर्शनम्‍ ॥ मज्जाक्षय लक्षण- शीर्यन्त एव चास्थिनि दुर्बलानि लघुनिच । प्रततं वातरोगाणि क्षीणे मज्जानि देहिनाम ॥च. सू. १७ अस्थ्नां मज्जनि सौषिर्यं भ्रमस्तिमिर दर्शनम्‍। वा.सु.११/१ मेद्क्षय लक्षणे- सन्धिनां स्फुटनं ग्लानिरक्ष्णोरायास एव च ॥ च.सू. १७/५९ संधिगत वात होण्यास स्रोतोदुष्टी हे मोठे कारण असते. व त्यादृष्टीने मेद, अस्थि व मज्जावह स्रोतसांच्या दुष्टी कारणांचा विचार करावा लागतो. अस्थिवह स्रोतस दुष्टी कारण-व्यायामदति संक्षोभादस्थ्नामति विघट्टनात्‍। अस्थिवाहिनि दृष्यन्ति वातलानां च सेवनात्‍॥च.वि. कलाय- वातज परम्‍| मेदोवह स्रोतस- अव्यायामाद्दिवास्वप्नात्मेद्यानां चाति भक्षणात्‍। मेदोवाहिनी दुष्यन्ति वारुण्याश्चाति सेवनात्‍॥ च. वि मज्जावह स्रोतस - उत्पेषादत्यभिष्यन्दादभिघातात्‍ प्रपीडनात्‍। मज्जावाहिनी दुष्यन्ति विरुध्दानां च सेवनात्‍॥ च.वि. ज्यावेळी वात कुपित होतो, त्यावेळी खालीलपैकी लक्षणे सापडतातच.

स्रंसव्यासव्यधस्वापसादरूक्तोद भेदनम्‍। ४९ सङगङ्गभंगसकोच वर्तहर्षणतर्षणम्‍। कम्प पारुष्य सौषिर्यशीर्ष स्पन्दन वेष्टनम्। ५० स्तंभः कषायरसता वर्णः शावोऽरुणोऽपि वा कर्माणि वायोः॥ प्रकुपितः वा.सू. १२/४९, ५० प्रकुपित वायुची खालील लक्षणे संधिगत वातात सापडतात. खरखरीतपणा, कर्कशपणा,वैशाद्य, पोकळपणा, अरुणवर्णता, शामवर्णता. संधिगत वात म्हणताना खूप सोपे वाटते, परंतु शरीरातील संधिच्या रचनेत कार्याप्रमाणे खूप फरक आहे. अनेक अस्थिमाळेप्रमाणे जोडलेले कशेरुकांमध्ये सापडतात, काही ठिकाणी दोन अस्थिंचा संधि आहे. कोठे तीन तर कोठे ७ ते ८ अस्थिसुध्दा संधिमध्ये भाग घेतात. कटोरीच्या संधिच्या ठिकाणी हालचाल नाही. त्यामुळे ते करवतीसारख्या रचनेने एकातएक अडकवले आहेत व तेथे सिरास्नायु – स्नायुप्रताने अभावानीच असतात. पुरःकपालास्थि दोन अस्थिचा असूनही हे दोन अस्थि एकमेकांत इतके संसक्त झाले आहेत की त्यामुळे तेथे दोन अस्थिंचा संयोग आहे असे समजतच नाही.

संधिगतवातात प्रामुख्याने खालील संधिशूलांचे प्रकार येतात. वातकंटक- हा गुल्फ संधिच्या आश्रयाने होणारा रोग आहे.चालताना गुल्फ संधिच्या ठिकाणी शूल असे याचे स्वरुप असते. खूप वेळ चालल्यामुळे वा चालताना पाऊल वेडेवाकडे पडल्यामुळे ही विकृती संभवते. यात संधि भग्न नसतो किंवा स्नायु- संधिबंधने-कूर्चा तुटत नाही. प्रमाणापेक्षा-स्नायुंवर, संधिबंधनांवर ताण पडल्याने त्यांच्यामधील काही पेशी तुटतात व त्यात रक्तस्राव होतो. स्नायुंमध्ये रक्तस्राव होतो व गुल्फावर शोथ येतो. बाह्य त्वकश्य रक्तवाहिन्याना इजा झाली तर त्वचेचा वर्ण तांबडट निळसर होतो. सामान्यतः ही मोच आल्याची संप्राप्ति असते. रूक पादे विषमन्यस्ते श्रमाद्वा जायते यदा । वातेन गुल्फमश्रित्य तमाहुर्वात कण्टकम्॥ अ.हृ.नि.१५५

कलाय खंज – यामध्ये वातकंटकाच्या पुढील संप्राप्ति घडते. ही संप्राप्ति सिरा- स्नायु व संधिबंधने यांच्या पुरती मर्यादित असते, येथे अस्थिभंग नसतो. वैकल्यकर मर्मावर आघात झाला तर असे घडू शकते. रुग्ण चालू लागताचा पायात कंप येतो व रुग्ण लंगडत चालतो. कम्पते गमानारम्भे खत्र्चग्निव च याति यः। कलायखत्र्जं तं विद्यान्मुक्तसंधि प्रबंधनम्॥ अ.हृ.नि. १५/४६

मन्या व कटीग्रह: व्यवहारामध्ये याला उसण भरणे असे म्हणतात. खरं तर संप्राप्ति वातकंटकाप्रमाणेच घडते. वेडेवाकडे बसणे, झोपणे, वजन उचलणे, मानेस अचानक ताण बसणे किंवा झटका बसणे यामुळे मन्या व कटीचे स्नायुंच्या ठिकाणी स्तंभ निर्माण होते. मन्या व कटी कशेरुका पुढल्या बाजुस धनुष्यासारख्याझुकलेल्या असल्या पाहिजेत त्या सरळ रेषेत येतात.स्नायुंच्या ठिकाणी आकुंच निर्माण झाल्यामुळे मानेच्या व कमरेच्या ठिकाणच्या हालचाली मंदावतात व त्याचा परिणाम सशूल व मर्यादित हालचालींमध्ये होतो. हे असे वरचेवर चालू राहिले तर, अभिघातामुळे किंवा वार्धक्यामुळे, कशेरुकांच्या स्वरुपात बदल होऊ लागतो. त्यांच्यामध्ये सौषिर्य निर्माण होते. दोन मणक्यांच्यामध्ये चिकट अस्थिमय पदार्थाची चकती असते. त्याला इंटरव्हर्टेब्रल डिस्क असे म्हणतात. या चकतीच्या मध्यभागी एक द्र्व घट्ट पिच्छिल पदार्थाची पिशवी असते. मणक्यांवर वरून किंवा खालून आघात आला तर ही चकती व त्यामधला पिच्छिल द्रवस्वरूप गोळा (न्युक्लीयस पॉलिपस) मणक्यांचे अभिघातापासून रक्षण करतो. रेल्वेच्या दोन डब्यांच्यामध्ये बंपर असतो. तशी ही रचना निसर्गाने केली आहे. मधली चकती (Intervertebral disc) जर दबू लागली तर हा पिच्छिल द्रवाचा गोळा चपट होतो व मधल्या फटीतून बाहेर पडून मज्जारज्जूवर दाब निर्माण करतो व त्यातून विश्वाची- विद्रधी सारखे रोग निर्माण होतात. येथे वायूची स्रंस, व्यास, व्यधाची लक्षणे दिसतात. काही कारणामुळे या ठिकाणी अस्थि सौषिर्य आले तर प्रत्येक हालचालीत वेदना निर्माण होतात- वाकडे बसणे, चालणे या सर्वच हालचाली सशूल होतात.

जानुसंधिच्या ठिकाणी संधिगतवात जास्त प्रमाणात आढळतो. ज्या दोन अस्थिंचा संधि बनतो त्यांच्या टोकाला एक आवरण असतो, त्याला (cartilage) असे म्हणतात. दोन अस्थिंच्यामध्ये विशेषतः जानुसंधिमध्ये अर्धचंद्राकृती असे खास आवरण असते, त्यामुळे दोन्ही सांध्यांची हालचाल सुलभ होते. या दोन अस्थिंच्यामध्ये एक द्रव पदार्थाची पिशवी असते. या पिशवीमुळे दोन अस्थि एकमेकांवर घासत नाहीत व ते अभिघात सहन करतात. या द्रव पदार्थांना श्लेष्मक कफ असे आयुर्वेदाने म्हटले आहे. अर्वाचीन शास्त्रात याला (Synovia) असे म्हणतात व हा पदार्थ निर्माण करणारा एक श्लेष्मल स्तर असतो त्याला (Synovial Membrane) असे म्हणतात. या श्लेष्मक द्रवामध्ये (Albumin) म्युसिन व फॅट हे पदार्थ असतात. या पदार्थांचा गुणधर्म बरोबर वायुच्या गुणधर्माच्या विरोधी आहे. मात्र काही कारणानी या श्लेष्मक कफाचे (Synovial Fluid) गुणधर्म कमी झाले. त्यांची निर्मिती झाली नाही तर मात्र विरुध्द गुणाचा वायु तेथे प्रवेशकरतो व वायूमुळे होणा-या अनेक विकृती या साध्यांत निर्माण करतो. आपण याचा समावेश संधिवातात करीत असलो तरी अर्वाचीन शास्त्र त्याचा समावेश (Rheumatoid Arthritis) मध्ये करते. या व्याधींचे वेगळेपण म्हणजे येथे अस्थि वेड्यावाकड्या होतात व काही वेळा अध्यस्थिही निर्माण होतात.

जानुप्रमाणे इतर सांध्यातही विकृति निर्माण होते. अशाच त-हेची विकृति आमावातामध्ये घडते. साधारणतः अनेक सांध्यांच्या ठिकाणी ही विकृती होते. अन्नामध्ये- प्रोटीन्सच्या सूक्ष्म पचन क्रियेतून काही वेळा (Uric acid) हा पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त उत्पन्न होतो व ते क्षार निरनिराळ्या संधिमध्ये जाऊन स्थिर होतात व त्यामुळे त्या त्या साध्यांत शूल व शोथ निर्माण होतो याला अर्वाचीन शास्त्रात (Gout) असे म्हणतात तर आयुर्वेदातील काही तज्ञ त्याला वातरक्त म्हणून समजतात. या व्याधावस्था सोडून इतर कारणांनी जर संधिशूल निर्माण झाला तर त्याचा समावेश संधिशूलात करावा. सामान्यतः तो Osteoarthritis म्हणून ओळखला जातो. जानुसंधिच्या आश्रयानी उत्पन्न होणारा वायू विकार म्हणजे क्रोष्टुकशीर्ष. यात वायुबरोबर रक्ताचीही संप्राप्ति असते. व व्याधीचे स्वरूप पित्तज शोथाप्रमाणे असते. सामान्यतः अभिघाताचा इतिहास सापडतो.

वातशोणितजः शोथो जानुमध्ये महारुजा । ज्ञेय क्रोष्टुकशीर्षस्तु स्थूलः क्रोष्टुक शीर्षवत्। सामान्यतः संधिगतवातामध्ये हाडे एकमेकांवर घासू लागतात, ती खरखरीत होतात. अस्थिंच्या टोकाला अस्थि सौषिर्यामुळे धारदार उंचवटे (Osteophytes) निर्माण होतात. हालचालींच्या वेळी वेदना असतात सांध्यांच्या ठिकाणी वक्रताही येते. या सर्व घटनांना वार्धक्य,प्रमेहासारखे विकार, हार्मोन्सची असमानता, कॅल्शियमसारख्या पार्थीव द्रव्याच्या चयापचय क्रियेत घडलेल्या गोष्टीमुळे संधिगत वात होतो. अर्वाचीन शास्त्रानुसार ह्या अस्थि-संधि विकृत्या या ब-या करण्यास कठीण असतात. अस्थिमध्ये प्रमुख पदार्थ आहे तो कॅल्शियम. त्याचेवर थॉयरॉईड, पॅरथॉयरॉईड पिच्युटरी व स्त्रीयांच्या फलकोशातून निर्माण होणारे क्लायनेस्ट्रॉल या हार्मोन्सचा चयापचय क्रियेमध्ये सहभाग असतो. आवश्यकतेप्रमाणे या अस्थिधातुतील कॅल्शियम शरीर उचलून घेते.राजयक्ष्मा व पॅनक्रियाटायटीसमध्ये ते सर्वात जास्त उचलले जाते. रक्तस्तंभन, हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी कॅल्शियमच लागते. तुटलेले हाड जुळून येण्यासाठी भग्न हाडाच्या इतर भागातून कॅल्शियम घेऊन भग्न बरा केला जातो. अस्थि धातुच्या उत्पत्ती, स्थिती ,लयाला वृक्क व पक्वाशयही तेवढेच जबाबदार असतात. वृक्कविकृति (Renal Rickets) उत्पन्न करतात. तर प्रवाहिका ही जानुसंधिशूल व विकृतिला कारणीभूत होते. अस्थिच्या पोकळीत मज्जाधातु असतो. त्या मज्जाधातुच्या सुस्थितीमुळे रस रक्तातील तांबड्या पेशी, पांढ-या पेशी,प्लेटलेट हे भाव उत्तम स्थितीत व योग्य प्रमाणात निर्माण होतात. मज्जा धातुमध्ये जर विकृती उत्पन्न झाल्या तर त्याचा परिणाम अस्थिधातुवर होतो. ल्युकीमियामध्ये मायलोमांची अस्थिमध्ये होणारी उत्पत्ती हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

आयुर्वेदाच्या दृष्टीनेही संधिविकृति ही अस्थी व मज्जेची विकृती आहे असेच समजावे लागते. त्यामुळे चिकित्सा करताना मेदोधातु- अस्थिधातु व मज्जाधातु व त्यांचे अग्नि यांचा विचार करावा लागतो त्याला कारण म्हणजे १) आश्रयाश्रयी संबंध २) मेदोधातुच्या उत्पत्तीमध्ये सूक्ष्मांशाने मेदो धातू असतो. आयुर्वेदानेही ज्या धातुवर चिकित्सा करावयाची त्याच्या आधिच्या व नंतरच्या धातुंचाही विचार करावा असे म्ह्टले आहे. ३) जानुसंधिच्या ठिकाणी जी संप्राप्ति निर्माण होते ती संप्राप्ती अस्थिगत वातात इतर संधिच्या ठिकाणी निर्माण होते. संधिगतवाताची चिकित्सा करणे खरं तर कठीणच पण प्रयत्न तर हवाच. संधिगतवातामध्ये मी स्वतः विध्द, अग्निकर्म,स्नेहन व स्वेदन हे उपक्रम करतो व इतर लाक्षणिक चिकित्सा करतो. मात्र खालील चिकित्सा सूत्रे विसरत नाही. चिकित्सा करताना श्लेष्मक कफाच्या गुणधर्माचा विचार प्रथम करावा व त्यात कमतरता निर्माण झाली असेल तर आहाराने व पथ्यापथ्याने दुरुस्त करावी. संधिसंश्लेषण, स्नेहन पूरण, बलस्थैर्य कृत्श्लेष्मा पंचधा प्रविभक्त उदक कर्मणा अनुग्रहं करोति । वाताचे (प्रकुपित) वाढलेले गुण कमी करावयाचे तर कफाचे गुण वाढविणे हे योग्यच. विरेको मांसमेदस्थे निरुहाः शमनानिच। बाह्यभ्यंतरतः स्नेहैरस्थि मज्जागतं जयेत्॥ च.चि. २८/२३ वातरोगांवरील सामान्य चिकित्सेचाही रोग्याची व रोगाची अवस्था ठरवून योग्य ती चिकित्सा करावी. सर्पिस्तैल वसा मज्जा सेकाभ्यजन बस्तयः । १०४ स्निग्धाः स्वेदा निवातं च स्थानं प्रावरणानिश्च रसः पयांसि भोज्यानि स्वाद्वम्लंलवणानिच ॥ १०५ बृहणं यच्च तत्‍ प्रशस्तं वातरोगिणाम्‍॥ अस्थ्याश्रयाणां व्याधीनां पंचकर्माणि भेषजम्। बस्तयः क्षीर सर्पिषि तिक्तकोपहितानि च ॥ च.सू २८

अस्थि संक्षयाज्जातात्‍ क्षीर घृतैस्तिक्त संयुतैः बस्तिभिस्तथा ॥ वा.सू.११ मज्जाशुक्रसमुस्यानौषध स्वादुतिक्तकम्। सर्वच वातविकारांत खालील सूत्रे महत्त्वाची: बस्तिः पुरिषाधाने कटिः सक्थीनी पादावस्थीनिच वातस्थानानि । अत्रापि च पक्वाशयो विशेषेण वातस्थानम्। इदं वैशौषिकं स्थानं ज्ञेयः यतः प्रायो वातादि विकारा भवति भूताश्च दुर्जया । अयत्र्च विजितेवाते सर्ववातविकारावलयः ।

वैद्य रा.ब. गोगटे G.F.A.M(BOM) A.V.P. (SURGERY) ,Pune निवृत्त प्राध्यापक व आयुर्वेदिक चिकित्सक,पुणे .

Please note: The article(s) were written by Dr. R. B. Gogate during 1961-2010. The fundamental relevance of these holds true even today, yet the readers/viewers should consider the timeline and the limited availability of the resources which might conflict with the recent advancements.

Gallery

संधिवात
संधिवात
संधिवात
संधिवात
संधिवात
संधिवात
संधिवात

Related articles