आयुर्वेदिय चिकित्सा करत असताना वेदना व शूल त्वरीत नाहीसा कसा करता येईल असा विचार माझ्या मनात सतत असे. व्यवहारामध्ये शूल असणारा माणूस अस्वस्थ असतो. कारण त्याला प्रत्येक क्रिया करताना त्रास जाणवत असतो. मला इन्जेक्शन द्या, गोळी द्या आणि शूल थांबवा असेच त्याचे मागणे असते. काही रुग्ण तर स्नेहन स्वेदनांदी उपचार घेउन आलेले असतात. सध्या शूल नाहीशी करणारी अनेक औषधे बाजारांत उपलब्ध आहेत. सामान्यतः ती NSAIDS मध्ये वर्गीकृत होतात.या सर्व औषधांचा रक्तवह व मूत्रवह स्रोतसावर – संस्थेवर विपरीत परिणाम होतो. अतिशय पित्त करण्याची त्यांची प्रवृत्ती असते.आणि अशा तर्हेचे होणारे परिणाम बरे करणे त्रासदायक ठरते. आयुर्वेदांतील शूलहर द्रव्ये NSAIDS इतकी प्रभावानी काम करणारी शूलहर नाहीत. स्नेहन-स्वेदन मर्यादित स्वरुपात उपशम देते. आयुर्वेदात प्रभावी शूलहर असे काही नाही हा गैरसमज आम्ही शिकत असताना सर्वांकडून ऐकू येणारा. एवढ्या मोठ्या वैद्यकशास्त्राला “ त्वरीत आराम देणारी” “शूलहर” चिकित्सा ठाऊक नाही हे मनाला सुरवातीपासूनच पटत नव्हते. शिकत असताना आणि नंतरही आयुर्वेदांत शूलासाठी म्हणून सांगितलेली दोन कर्मे – अग्नीकर्म- व रक्तमोक्ष-विध्द चिकित्सेचा उपयोग कुणीच करत नाही अस मी सतत पाहत होतो. वातज शूलामध्ये तर तो खासच उपाय आहे. “साधा व सोपा”. या दोन्हीचा उल्लेख अथातो अग्निकर्म विधि अध्यायं व्याख्यास्यामः। सु.सू.१२ अथातः सिराव्यध विधि शारीरं व्याख्यास्यामः। सु.शा. ८ या दोनही अध्यायांचे मी मनःपूर्वक अनेक वेळा अध्ययन केले.त्यांतील कर्मे करून प्रत्यक्ष अनुभव घेण्यास सुरुवात केली. हे करित असताना ज्या गोष्टिंचा सुरवातीस उगम आला नाही तो येत गेला. हे सर्व करित असताना अनेक गोष्टि संक्षेपाने आल्या होत्या त्याचा खुलासा होणे आवश्यक होते. उदा. अंगुली प्रमाण, विध्दस्थाने, यव , अर्धयव, ब्रिही-खोल व्यध इत्यादी. विचार करत असताना अस लक्षांत आलं की चायनीज वैद्यकशास्त्र व आयुर्वेद वैद्यक शास्त्र ही दोन्ही समकालीन म्हणजे सुमारे ४००० वर्षांपूर्वीची आहेत. इंडोनेशीयाही आपल्या जवळचा की जेथे आपल्यापेक्षाही जास्त भारतीयत्व टिकून आहे. हा सर्वभूभाग एकमेकांना जोडलेला आहे आणि म्हणून सर्वच बाबतीत देवाण घेवाण होत असणार. आयुर्वेद व चायनीज वैद्यक शास्त्र यामध्ये एक महत्त्वाचे तत्त्व सारखेच आहे ते तत्त्व म्हणजे उष्ण व शीत . बाह्य व अभ्यंतर चिकित्सेत याचाच प्रामुख्यानी उपयोग केला जातो. दोन्ही तत्त्वांची साम्यावस्था म्हणजे आरोय अशीच संकल्पना दोन्ही शास्त्रांची. त्यात ग्रंथविस्तार भयाने आयुर्वेदशास्त्रात अनेक.गॊष्टी संक्षेपाने आल्या आहेत या संक्षेपाने उलगडा झाला नाही तर इतरेतर शास्त्रांचा अभ्यास करुन खुलासा करुन घ्यावा असे आयुर्वेद म्हणतो.
एकं शास्त्रमधीयानो न विद्याच्छास्त्र निश्चयम । तस्मात बहुश्रृतः शास्त्रं विजानीयाच्छिकित्सक: ॥ सु.सू.४/७ न हि बहुश्रृतोऽन संक्षिप्तानव्यर्थान बीज भूतानन्यशास्त्रसंस्कारादनायासे- नावगच्छति ॥ टीका
विध्द चिकित्सा व अग्निकर्म चिकित्सा चायनीज वैद्यक शास्त्रात आहे असे ऐकून होतो. पण मुद्दामहून त्याचा असा अभ्यास केला नव्हता. कारण शिकत असतानाही या दोनही शास्त्राबद्दल पूर्वग्रहदूषिततः समाजांतील घटकांनी, औषधांचा व्यापार करणार्यांनी व त्याना धंदा मिळवून देणार्या दलालांनी करुन दिली होती. त्यांना आपली औषधे खपवून श्रीमंत व्हावयाचे होते. म्हणून एकदा या इतरेतर शास्त्रात काय आहे याचा पडताळा घेण्यासाठी चायनीज अँक्युपंक्चर व मॉक्झीबुशनचे शासकीय (चायनीज) पुस्तक मिळ्वले व त्याचा २ वेळा अभ्यास केला. आणि अस लक्षात आल कि या दोन्ही शास्त्रात खुप साधर्म्य आहे. आयुर्वेदाने तर अगदी थोडक्या विध्द जागा सांगून अनेक व्याधी / वा लक्षणे निवारण करण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही मधील साधर्म्याचा विचार केला की खालील गोष्टींचा खुलासा छान होतो.
१) अंगुली प्रमाण हे दोन्ही शास्त्रांनी सांगितले आहे. अंगुली प्रमाण हे रुग्णाच्या अंगुली प्रमाणांत घ्यावयाचे आहे. सर्फेस अँनाटोमीचा विचार महत्त्वाचा. २) आड्वी व उभी मापे घेताना कोणते अंगुली प्रमाण घ्यावयाचे आहे याचा स्पष्ट खुलासा चायनीज वैद्यकीय शास्त्रात आहे. आयुर्वेदाने ४ अंगुली प्रमाण- कपाळ ,नाक इत्यादींच्या बाबतींत कसे असावे असे सांगतांना केले आहे.अंगुल प्रमाण हत्यारांची लांबी सांगतांना सांगितले. परिणाम सांगताना पर्व प्रमाण सांगितले. विध्दाची खोली यव, व्रीही, प्रमाणांत सांगितली आहे.
३) आयुर्वेदाने विध्द चिकित्सा – आवृत्त/ मार्गावरोधजन्य वातवृध्दित वायू काढण्यासाठी,साठलेले द्रवपदार्थ –मूत्रवृध्दी,दकोदर, विद्रधी पू (अस्थिगत वात-अस्थिविद्रधी),दूषीत रक्त काढण्यासाठी सांगितली. चायनीज अँक्युपंक्चर मधे नेमके तेच उद्देश सांगितले आहेत. ४) अग्निकर्मासाठी- ( मॉक्सीबुशन) आयुर्वेदानी पिंपळी,बिब्बा, हळद, (गुळ) या वनस्पती जन्य पदार्थांचा उपयोग सांगितला आहे. चायनीज वैद्यक शास्त्र आले,लसूण,दवणा यांचा उपयोग करते.
५)चायनीज मेडीसीन मधे अग्निकर्मा साठी लोह शलाका सांगितली आहे तर आयुर्वेदात पंचधातूंचा उपयोग सांगितला आहे. ६)आयुर्वेदाने अग्निकर्म चिकित्सा अपुनर्भव चिकित्सा म्हणुन सांगितली आहे तसे चायनीज मॉक्सीबुशन मधे नाही ७)आयुर्वेदाने- अग्निकर्म व विध्द स्थाने सांगतांना मर्म स्थाने विचारात घेतली आहेत तसा विचार चायनीज वैद्यक शास्त्रांत नाही ८) चायनीज वैद्यकीय शास्त्र शैत्याने उत्पन्न होणार्या व्याधींमधे मॉक्सीबुशन सांगितले आहे. आयुर्वेद तेच सांगतो. ९) वायू जनीत शूलामध्ये विध्द चिकित्सा सांगितली आहे. आयुर्वेद व चायनीज विध्द व अग्निकर्म स्थाने तीच आहेत पण आयुर्वेदाने संसोधकांचे नाव देण्याचे टाळले आहे.
आयुर्वेद विध्द स्थान चायनीज विध्दस्थान तेच पण नावाने:
जिव्हामूले व्यधेत Vuve, Jinjng
उपनासिके-नासासमीपे Bitong, Vinxiang
ललाट्या Xiaguan- moxibution applicaton
भ्रूपुच्छे Si Zhukong
हनुसंधी मध्यम Daheng, Suliaoo
नासाग्रे Moxibution application
१०) आयुर्वेद शास्त्रात ज्यावेळी विध्द चिकित्सेचा उपयोग होत नाही त्यावेळी अग्निकर्म करावयास सांगितले आहे.चायनीज वैद्यकीय शास्त्रात अनेक ठिकाणी अँक्युपंक्चर अग्निकर्म करावयास सांगितले आहे.
शाम्यतेव न चच्छुलं स्निग्ध स्विन्नस्य मोक्षयेत। ततः सिरा दहेद्वापि मतिमान किर्तिते यथा॥ सु.उ. १७/ १८ सिरा औपनासिका अपाङया ललाट्यां वा । न केवलं सिरा मोक्षयेत दहेद्वा । किर्तितं यथेति भ्रूललाट शंख प्रदेशेषु दहेत वा॥ या सूत्रावरुन आपणास असा बोध होतो की जी विध्दस्थाने सांगितली आहेत तीच अग्निकर्मास वापरण्यास हरकत नाही व मी तसेच कोणतेही व्यापत न येता व्यवहारांत प्रत्यक्षांत वापरतो. १२) स्नेहन स्वेदन अग्निकर्म व विध्द चिकित्सा ज्यावेळी संप्राप्ती स्नायू संधीच्या संबंधात असेल त्यावेळी वरचेवर करावयाच्या आहेत. चायनीज शास्त्र तेच सांगते.
स्नेहोपनाहाग्निकर्मबन्धनोन्मर्दनानि च । स्नायु सन्ध्यास्थि संप्राप्ते कुर्याव्दायावतिन्द्रितः । सु.चि.८/४ अतन्द्रितोऽनलसः। एतेन चिरकालं निरन्तरं क्रियेति दर्शयति॥ टीका आयुर्वेद शास्त्राने – रस रक्त या दोन्ही धातूंचे सहकार्य व सतत असणारा सहवास याला महत्व दिले आहे.दोन्हीही एकमेकांच्या – ऊष्णत्व व शीतत्वाचा विचार केला तर ते दोन्ही एकमेकांच्या विरुध्द गुणाचे असून एकत्र नांदतात.त्याच्या गुणांमध्ये जर काही कमी जास्त झाले तर साम्यावस्था बिघडते व व्याधीला सुरुवात होते. म्हणून धातुसाम्य खर्या अर्थाने टिकविणे तेथुनच सुरु होते. हे धातु सिरांमधून एकत्र शरीरांत फिरत असतात नांदत असतात. कफ व पित्त पंगुच आहेत.त्यांना वायु शरीरांत फिरवितो हे वायूही द्रवस्वरुपांत असतात. सुश्रुतांनी वात,पित्त,कफ व रक्त सिरांमधून बाहेर एकत्र वाहतात असे सांगितले आहे आणि ते बरोबर आहे. पित्ताची उत्पत्ती रक्तातून, कफाची रसातून, रसामधून उत्पन्न झालेले रक्त याचे साहचर्य सहज समजते. हे दोन्हीही धातु चल स्वरुपाचे आहेत. हे चलत्व वायूच्या खेरीज असू शकत नाही. हा वायू श्वसनाच्या प्रक्रियेतून व पचन क्रियेमधून उत्पन्न होऊन शरीरांत रक्तवाहिन्यांमध्ये उचलला जातो किंवा सूक्ष्म पचनात अँसिटिल कोलीनच्या माध्यमातून व्यक्त होतात. यामध्ये o2 व Сo2 हा सातत्याने असणारा वायू आहे. नैट्रोजनही नेहमी आढळणारा आहे. आयुर्वेदाने उष्ण व शीत अशी दोनच तत्वे मांडली आहेत. उष्णतत्व उर्ध्वगामी आहे तर शीत तत्व अधॊगामी आहे.(अग्नी व जल)-
the upper part of the body is yang (heat) and lower part is yin(cold).Ref (CM)
आयुर्वेदानी विंशती गुण सांगितले पण मुख्य १० गुण व त्याची न्यूनता म्हणुन विरोधी गुण. गुरु मंद हिम.........विंशति स विपर्ययः। एकाची वाढ – त्याचा विरुध्द गुण कमी होतो. उष्ण्गुण वाढला- शीतगुण कमी. एकाचा क्षय-त्याचा विरुध्द गुण वाढतो.(ऊष्ण्गुण कमी झाला शीत वाढतो).
Although the pathological changes that occur in disease are complicated and subject to change, they can be generalised & explaied by imbalance of yin and yang.Excess of Yin leading to cold syndrome. Excess of Yang leading to heat syndrome. Deficiency of yang leading to cold syndrome. Deficiency of Yin leading to heat syndrome. Ref (chinese medicine).
यावरुन असे स्पष्ट होते की दोन्हीही शास्त्रांमध्ये शरीराकडे पाहण्याची व रोग बरा करण्याची एकच तत्व प्रणाली आहे. कुणी कुणाला दिले, का हिंदुस्थान व चीन एकच देश होतातो विषय त्या विषयांतील तज्ञांचा. ऊष्ण व शीत तत्त्वांची बिघडलेली साम्यावस्था अल्पावधित व कोणतेही NSAID सारखी विषारी औषधी न देता विध्द व अग्निकर्माने रुग्णावर कोणताही आर्थिक बोजा न टाकता साधता येते. शूल तर त्वरीत थांबतो. आपणही हे सर्व करावे. ज्यांना ज्यांना हे शिकायचे होते त्यांना त्यांना ही सर्व कर्मे हुबळी ८४ रुग्ण,शिरोडा ९७ रुग्ण, देवरुख ६२ रुग्ण. शिवाय पुणे,ठाणे.सावंतवाडी येथेही याची प्रत्यक्ष दाखविली आहेत. पाच हजारापेक्षा अधिक रुग्ण झाल्याखेरीज या संबधात पुस्तक लिहायचे नाही असे ठर्विले होते.आता तो संकल्प पुरा झाला. त्यास कोणतेही व्यापत झाले नाही. म्हणून आपण सर्वांनी या उपक्रमांचे पुनः पुनरजीवन करावे व आयुर्वेद शास्वत करावा- खर तर तो आहेच.
Please note: The article(s) were written by Dr. R. B. Gogate during 1961-2010. The fundamental relevance of these holds true even today, yet the readers/viewers should consider the timeline and the limited availability of the resources which might conflict with the recent advancements.
Gallery


