आयुर्वेदामध्ये स्थुलमानाने गर्भाची गर्भाशयांत मासानुमासिक होणारी वाढ अर्वाचीन शास्त्रातील क्ष- किरण, सोनोग्राफी, सीटीस्कॅन, पेशीपरिक्षण यामुळे आलेली सूक्ष्मता सोडली तर ती मिळतीजुळती आहे. स्थुलमानाने गर्भाशयांत होणारी गर्भाची वाढ अगदी इंद्रियांच्या वाढीपासून त्यावेळी सध्या सारख्या सुविधा नसतानाही कशा अचूक लिहिल्या गेल्या हा कुतुहलाचा विषय आहे.
आयुर्वेदामध्ये काही गोष्टीचे ज्ञान तपस्वीच्या अतिंद्रियांनी घडत असा उल्लेख सापडतो. कदाचित त्यावेळी असे काही ऋषीमुनी असतील की त्यांना हे ज्ञान त्यांच्या सुक्ष्मेंद्रियांनी झाले असावे.
“ इदम आगम सिध्दत्वात प्रत्यक्ष फल दर्शनात”
हे ग्रंथात आलेल सूत्र ही येथे विचारांत घेणे आवश्यक आहे. त्याकाळी अपघातामुळे, विषप्रयोगाने, आजारांमुळे किंवा नैसर्गिकतः गर्भस्राव / गर्भपात होत असतील. अशा या गर्भाचे गर्भस्राव/ गर्भपाताचा काळ आणि डोळ्याला दिसलेले शिर, शाखा, नेत्र, कर्णमुखादी भाग यांचा अभ्यास अनेक वैद्यांनी केला असेल व त्याची नोंद केली असेल आणि त्यांच्या संकलात्मक अभ्यासातून जे सर्वत्र सामान्य सापडले त्याचे एकत्रीकरण करून गर्भ विज्ञान तयार झाले असेल. प्रत्येक टाकावू वस्तूचा सूक्ष्म अभ्यास करण्याच्या प्रयत्नातून हे घडल असल पाहिजे.
गर्भिणी परिक्षणातून सुध्दा गर्भाच्या अवयवाची उत्पत्ती व शाखांची स्थिती याचा अभ्यास स्पर्शन परिक्षेवरून केला असेल. पोटाला कान लावून हृदयध्वनी ऐकले असतील ते कोणत्या महिन्यात ऐकू येतात. याची अनेक वैद्यांनी अनेक वेळा नोंद केली असेल, गर्भाच्या पोटांतील हालचाली स्पर्शज्ञानाने ठरविल्या; अभ्यासातल्या असतील, त्या प्रमाणापेक्षा वाढल्या तर काय होते याचा अभ्यास झाला आहे, त्यातून क्रोशन सारखी बाळाची संप्राप्ति समजून घेतली. दर महिन्यास होणारी गर्भाशयाची वाढ नोंदवून त्यावरून सामान्यतः कोणत्या महिन्यांत किती वाढ हे पाहिले असेल. ती ज्यावेळी दिसली नाही त्यावेळी शुष्क उपशुष्क गर्भाची संप्राप्ति मांडली गेली. ज्यावेळी पोटात मुलाच्या गर्भाच्या ठराविक महिन्यांत हालचाली गर्भिणीला जाणवल्या नाहींत, ज्यावेळी गर्भाचे ठराविक महिन्यांत हालचाली गर्भिणीला जाणवल्या नाहींत किंवा वैद्याला स्पर्शन परीक्षेस लागल्या नाहीत, ज्यावेळी गर्भाचे हृदय स्पंदन ऐकू आले नाही त्यावेळी त्याचे निदान स्तंभिनी योनी असे केले. शेवटपर्यंत गर्भाची वाढ झालेली पाहिली व मूल मात्र मृतावस्थेत जन्मले त्यावेळी या संप्राप्तिला नाकिनी म्हटले गेले. ज्यावेळी गर्भाची वाढ शेवटपर्यंत पूर्ण होते व त्यावेळी गर्भ व गर्भिणीच्या जीवाला धोका पोहोचतो त्यावेळी या संप्राप्तिला कालरात्री म्हटले. ज्यावेळी गर्भ स्थानभ्रष्ट होतो व गर्भिणीही मृत पावते त्यावेळी त्या संप्राप्तीला मोहिनी नाव दिले गेले. यासाठी प्रथम प्रकृतीचा अभ्यास झाला व ज्यावेळी त्यांत विकृती सापडली त्यावेळी ती वेगळी संप्राप्ति मांडली गेली. योनी व्यापदात वर्णन केलेली पुत्रघ्नी किंवा हरितांच्या वंध्येच्या ६ प्रकारांतील ४ था व ५ वा प्रकार याच अभ्यासातून मांडला गेला. अर्थात या सर्वासाठी त्यावेळी अनेक वैद्यांनी दिवस राहिल्यापासून प्रत्येक गर्भिणीचा सूक्ष्म अभ्यास केला असला पाहिजे, नाही तर त्याला शाश्वत्व आलेच नसते. सध्या सुध्दा हे सर्व प्रकार व्यवहारांत सापडतात. फक्त आताच्या परीक्षणाच्या सुविधांनी असे का घडले याचे ज्ञान झाले. प्रसवाच्या वेळी अपत्य बाहेर येण्याआधी येणारे पाणी पाहून त्याला गर्भोदक म्हटले गेले. हे पाणी स्वच्छ येते असे पाहून त्यावरून गर्भाचे पोषण अन्नमलावर होत नाही व म्हणून मूल मलप्रवृत्ती करीत नाही असे ठासून सांगितले व अद्याप तेही शाश्वत आहे. मूत्र प्रवृत्ती करत नाही हे ही सांगितले आहे. अर्वाचीन शास्त्राप्रमाणे पाचव्या महिन्यानंतर गर्भोदकाचा ५०% वाटा गर्भमूत्राचा असतो.माता मृत आहे व गर्भ जिवंत आहे, अशा वेळी गर्भाचे निर्हरण ‘ उदरावर छेद घेऊन करावे’ असे वचन आहे. त्यावेळी गर्भाशयावर छेद घेतल्यावर आलेले जल पाहून त्याला गर्भोदक म्हटले. काही वेळा सकोष गर्भाची प्रसूती होते. त्यावेळी गर्भाच्या भोवतीच्या आवरणांत असलेले जल पाहून त्याला गर्भोदक म्हटले. ज्यावेळी पहिल्या २ महिन्यांत गर्भस्राव झाल्यानंतर त्यांना अपरा व गर्भनाडी दिसली नाही, त्यावेळी त्यांनी गर्भाचे पोषण मडक्यांतून पाणी झिरपते त्याचप्रमाणे गर्भाशयातून रस झिरपण्याने होते असे मांडले. अनेक गर्भस्राव व पात यांचा अभ्यास करुन कोणत्या महिन्यांत कोणते अवयव निर्माण होतात याची निश्चिती झाली. येथे दर्शन परीक्षेने काम केले. पुंसवन विधी केव्हा करावा याचा निर्णय १ल्या व २-या महिन्यांत झालेल्या अनेक गर्भस्रावाच्या गर्भाचा अभ्यास करून मांडला गेला असला पाहिजे. तसेच त्याच्या मध्य स्थितीत गर्भलिंग ठरलेले नसते, हे ठासून सांगता आले. हे सर्व घडले ते दर्शन,स्पर्शन व प्रश्न यांच्या आधारे केलेल्या अभ्यासातून. याच स्थितीला सध्याचे प्रगत शास्त्र (Indifferent sex stage) असे म्हणतो. आणि त्याचा शोध लावायला अर्वाचीन शास्त्राला २० वे शतक पाहावे लागले.
पहिला महिना
कलल व बुडबुड्यांचे स्वरुप .
मऊ गोळ्याला ४ थ्या आठवड्यांत घनत्व येते. या महिन्यात सौम्य शुक्र व आग्नेय आर्तव, विरूध्द गुणाची असली तरी यांच्या आश्रयानी असलेली महाभूते परस्पर सहाय्यक व परस्परांच्या आश्रयांनी आपापले कार्य सूक्ष्म स्वरूपांत करावयास सुरूवात करतात.
स तु सर्व गुणवान् गर्भत्वमापन्नः प्रथमे मासि संमूर्च्छितः । सर्वधातु कलली कृत खेटभूतो भवत्यव्यक्त विग्रहः सदसद् भूताङावयवः ॥ च.शा.
सौम्यं शुक्रमार्तवमाग्नेयभिरेतषामध्यत्र भूतानां सानिध्यमस्त्यणुना विशेषेण परस्परोपकारात् (पर्स्परानुग्रहात्) परस्परानुप्रवेशाच्च ॥ सु.शा.
शुक्र शोणिताचा संयोग होतो त्यावेळीच लिंग ठरते. शुक्राचे बाहुल्य पुरूष लिंग, आर्तव बाहुल्य स्त्री लिंग व दोन्हीही समप्रमाणांत झाली तर नपुंसक लिंग उत्पन्न होते.
अत एव च शुक्रस्य बाहुल्यात जायते पूमान ॥
रक्तस्य स्त्री तयो साम्ये क्लीबं ॥ वा.शा.
First Month Medical Embryology
Fertilisation
Morula (12-16 cell stage) enters the uterus
Blastocyst implant
Implantation complete
Primary yolk sac forms
Secondary yolk sac forms ( Ref. Sonographic embryology)
A mesodermal layer forms between the endoderm & ectoderm and these three germ layers develops into the embryo proper.
(Ref. Taber’s cyclopedic medical dictionary)
Determination of sex of new individual
An X carrying sperm will produce female XX embryo and Y carrying sperm male XY embryo. Hence the chromosomal sex of embryo is determined at fertilization. (Ref. Medical embryology T.W. sadler) 16 th day haematopoiesis starts in yolk sac.
दुसरा महिना
द्वितीये मासि घनः सम्पद्यते पिंडः पेश्यर्बुद वा ॥ तत्र घनः पुरूषः पेशी स्री अर्बुदम नपुंसकम् ॥ च.शा. ४/१०
या महिन्यात गर्भातील महाभूत संघात एकत्र येतात व घट्ट होतात त्याला पिंड (पुरूष) , पेशी (स्त्री), किंवा अर्बुद (नपुंसक) असे आकार निर्माण होतात.
एवं विवर्धितः स यदा हस्तपाद जिव्हा घ्राण कर्ण नितंबादि भिरंगैरूपेत स्तदा शरीर इति संज्ञा लभतेः ॥ षडङं शाखाश्च तस्रो मध्यं पंचमं षष्ठं शिर इति ॥ सु.शा. ५/३
वायू, अग्नि, जल, पृथ्वी व आकाश ही गर्भामधील महाभूते आपापल्या गुण कर्मानी गर्भाच्या ठिकाणी हात,पाय, जीभ , घ्राण, कर्ण नितंबादि उत्पन्न होतात व षडंगाची ( ४ शाखा, १ मध्य व १ शिर) उत्पत्ती करतात त्यावेळी त्याला शरीर असे म्हणतात. या महाभूतांमध्ये विगुणता आली किंवा असली तर त्यामुळे गर्भाच्या ठिकाणी आली किंवा असली तर त्यामुळे गर्भाच्या ठिकाणी त्या महाभूताच्या क्षेत्रांतील विकृत्या संभवतात.
सद्यो गृहित गर्भाची लक्षणे दिसू लागल्यावर व लिंग (शरीर) लक्षणे व्यक्त होण्यापूर्वी विशिष्ट अपत्याची इच्छा असेल तर पुंसवन नावाचा विधी करावा. गर्भामध्ये दुस-या महिन्याच्या शेवटी अंगप्रत्यंगे व्यक्त होत असतात, म्हणून ती व्यक्त होण्यापूर्वी हा विधी करावा.
सप्ताहात कलली भवेत ॥
गर्भः पुंसवनान्यात्र पूर्व व्यक्ते प्रयोजयेत् ॥ वा.शा. १/१७
सप्ताहादर्वाग्गर्भ गोलकः शेष्म पिंडी भूतो भवती ॥
सप्ताहादनन्तरं यावन्मास स्तावद व्यक्ताकृति ॥
अत्र कलली भूते यावत स्त्रीपुरूषाद्युत्पति लक्षणा व्यक्ति नं भवति तावत् व्यक्तेः प्राक
प्रथमे मांसी पूंसवनानि प्रयोजयेतः ॥ वा.शा. ३/१७
Second Month
27-28 days- Caudal neuropores closing or closed; upper limb buds appear ; 3 pairs of visceral arches present. 31-35 days – Forelimbs paddle shaped; nasal pits formed; embryo tightly ‘C’ shaped.
36-42 days – Digital rays present in hands and foot plates; brain vesicles prominent ; external auricular hillocks forming umbilical herniation initiation
43-49 days - Pigmentation of the retina visible; digital rays separating ; nipples and eyelids formed ; maxillary swellings as upper lips forms; prominent umbilical herniation.
50-56 days – Limbs long and bent at elbow and knees; fingers and toes free ; face more human like ; tail disappear; umbilical herniation persists until the end of 3rd month.
The embryo increases in length 1.5 mm to 23mm
The germ layer of embryonic disc give rise to principal organ system and embryo begins to show human form.
The embryo is particularly very sensitive to viral infections (rubella) toxic chemicals and alcohol & tobacco amoke, it is sensitive to hypoxemia
गर्भवर्णउत्पत्ती
तत्र दृष्टीभागमप्रिपन्नं तेजो जात्यन्धंकरोती तदेवरकपित्तानुगतं पिंगाक्ष, श्लेष्मानुगत शुक्लाक्षं, वातानुगत विकृताक्षमिति ॥ सु.शा.२/३५
गर्भाचे नेत्र व त्याचा वर्ण याची उत्पत्ती तेजोधातुच्या परिणामावर अवलंबून असते. नेत्र गोलकामध्ये तेजाचा प्रवेश झाला नाही तर मूल जन्मान्ध होते. रक्तानुबंध आला तर डोळे तांबूस,कफानुबंध शुक्ल, पित्तानुबंधात पिंगट होतात व वाताचा अनुबंध आला तर विकृत रंगाचे होतात/ विकृती उत्पन्न होते.
Endoderm gives rise to epithelium of alimentary canal, liver, pancreas and lungs.
Mesoderm gives rise to epithelium of muscles, all connective tissue, blood, lymphatic tissue, body cavities and gonads, kidneys and suprarenal cortex.
Embryo gives rise to epidermis nervous tissue, hypophysis and the epithelium of nasal cavity, mouth salivary glands , bladder & urethra.
Abnormal zygotes
Abnormal zygotes in human and other mammalians have been described. The exact number of abnormal zygotes formed are usually lost in early pregnancy (within two to three weeks after fertilisation ) before the women realizes she is pregnant and are therefore not detected. Estimated suggest that as many as 50% of the pregnancies end in spontaneous abortion and that half of these are due to chromosomal abnormalities, these abortions serve as a natural means of screening embryo for defects and in this manner reduce the incidence of congenital malformation / within this phenomenon approximately 12% instead of 2-3% of all infants would have congenital defect. ( page 33 Medical embryology T.W. sadler)
हरिताची योनी प्रकार ४ था
दुर्धरा योनी
जिच्या गर्भाचे नेहमी स्राव होतात.
गर्भाला देहाचा थोडासा आकार येताच त्याचा नाश होतो.
गर्भस्रावी तृतीयाऽथ कथिता मुनिसत्तमैः ॥
नाति निवृत्त देहा यस्य गर्भा विनश्यते ॥ हा.स. तृतीय स्थान अ.४८/१.२
दुर्धरा नाम सा ज्ञेया सुघोरा जातहारिणाम ॥ का.सं.पान १९२
या योन्यांचा अंतर्भाव Abnormal zygotes मध्ये होऊ शकतो
तिसरा महिना
इंद्रिये व सर्व अवयवांची उत्पत्ती. हात पाय व डोळे यांचे अंकूर निर्माण होतात. तिसर्या महिन्यामध्ये सर्व इंद्रिये, सर्व अंगावयव एकदम उत्पन्न होतात.
सर्वेंद्रियाणि सर्वाङगवयवाश्च योगैपत्येन अभि निर्वर्तन्ते ॥
दन्तश्मश्रु स्तनादीनां व्यक्तीभवनं जातस्य उत्तर कालक्रमेण गर्भः ॥ च.शा.४/११ पंचधा परोहति ॥ तद्यथा सक्थिनी बाहु शिरश्च ॥ सक्थ्यादि प्ररोहकै- कालमेव च सर्वदावयवेन इन्द्रियाणि युगपत्संभवति ॥ अ.शा. २.५४, ५५ या महिन्यांत इंद्रिये उत्पन्न होतात, त्याच महिन्यात गर्भामध्ये सुखदुःख उत्पन्न होते. तो चलनवलन करू लगतो. त्याच्यामध्ये हृदय हा अवयव उत्पन्न होतो. हे हृदय नाभिस्थ गर्भनाडी व अपरेमार्फत मातेच्या हृदयाशी जोडले जाते.त्यामुळे या महिन्यांत दोन हृदये होतात. मातेचे व गर्भाचे म्हणून गर्भिणीला द्विहृदया असे म्हणतात.
तस्य यत्कालमेव इंद्रियाणि संतिष्ठंते ते तत् कालमेव
वेदनानिर्बंधम् प्राप्नोती॥ तस्मात् तदा प्रभृति गर्भः स्पंदते आचक्षते वृध्दः ॥ मातृजं चास्य हृदयंमातृहृदयेन अभिसंबध्दं भवति रस वाहिनीभिः संवाहिनीभिः ॥ च.शा.४/१५
9th week: Upper limbs bent at elbow ; fingers are distinct; 3rd and lateral ventricles are identified.
10th week : Anal membrane perforates; external genitals still sexless. Liver takes the function of haematopoesis and is gradually shifted to spleen & bone marrow; fetal pituitary secrets ACTH; Prolactin & Gonadotropin
11th week : kidneys in adult position . Fetal Thyroid starts synthesis of Thyroprotein .
12th week: pancreas starts secreting insulin.
चौथा महिना
अंगप्रत्यंग व्यक्ततर होतात व गर्भाला स्थिरत्व येते. यावेळी गर्भाच्या अवयवांची विशेष वाढ सुरू होत असल्याने गर्भिणीच्या हालचाली हळू होतात.
अंगप्रत्यंग विभागः प्रव्यक्तः गर्भश्च स्थिरो भवति ॥ अ. संग्रह शा.२/११
स्थिरत्वं आपद्यते गर्भः ॥ तस्मादत्ता गर्भिणी गुरू गात्रत्वं अधिकं आपद्यते विशेषेण ।। च.शा. ४/२० सर्वांङःप्रत्यंग विभागः प्र व्यक्तोभवति ॥ गर्भहृदयं प्र व्यक्तिभावः गर्भ इंद्रियार्थेषु अभिप्राय करोती ॥ द्विहृदयाच नारी द्वौहृदिनी आचक्षते ॥ सु.शा. ३/१८
सुश्रुतानुसार या महिन्यांत सर्व अंग प्रत्यंग उत्कटतेने व्यक्त होतात गर्भाचे हृदयाची क्रिया सुरू होते, गर्भ आपल्या भावना व्यक्त करतो मातेच्या शरीरांत एकाच वेळी दोनहृदये कार्यरत असल्याने तिला द्वौहृदिनी असे ओळखले जाते.
16th week : Colourless hair develop.
16th week : Fetus swallows amniotic fluid.
पाचवा महिना
गर्भ मन जाणीव युक्त होते. गर्भमांस शोणितादी धातुंचा उपचय होतो त्यामुळे गर्भिणी कृश व दुर्बल बनते. चेतना उत्पन्न होते.पृष्ट वंश आकार घेतो.
मनः प्रतिबुध्दतरं भवति ॥ सु.शा.
मनः प्रतिबुध्दतरं भवति मांसशोणितोपचयश्च ॥ अ.स.शा.
गर्भस्य मांसशोणितोपचयो भवति अधिकं अन्येभ्यो मासेभ्यः ॥
तस्माद्ता गर्भिणी कार्शङमापद्यते विशेषेण ॥ च.शा.
पंचमे पृष्ट वंशो भवति ॥ गर्भोपनिषद्
A fetus (normal) is considered as equivalent to innocent tumor: Fetus grows at the cost of mother without subserving any useful purpose to mother. A classical example is the lipoma which retains its size and may even enlarge while all the other fat deposits in the body are being depleted as a result of starvation. ( surgical pathology, IIling worth & click.)
20th week: Horny epidermis appear prior to it the skin helps transudations of fetal capillaries into the liquor amnii.
20th week : Meconium appears in Gastro intestinal tract and gradually the whole tract up to the rectum is painted with meconium due to peristalsis.
सहावा महिना
बुध्दिः ॥ सु.शा. ३/३०
बुध्दी व ओज निर्माण होते.
केशरोमनखास्थि स्नाय्वादीनि अभिव्यक्तानि बलवर्णोपचयश्च ॥ अ.स.शा.२/३३ केस,रोम,नख, स्नायु,बल,वर्ण व अग्नि (याचा अर्थ अन्नवहस्रोतस यकृत व अग्न्याशय ) हे भाव रूप घेतात.मुख नाक डोळे कान यांचे आकार स्पष्ट होतात. ...........गर्भोपनिषद.
या महिन्यांत गर्भाची वाढ अधिकच झाल्याने गर्भिणीचे बल कमी होते व वर्णही बदलतो.
गर्भस्य बलवर्णोपचयो भवति अधिकं अन्येभ्यो मासेभ्यः ॥
तस्मात्तदा गर्भिणी बलवर्णहानिमाद्यते विशेषेण ॥ च.शा. ४/२२
सातवा महिना
सातव्या महिन्यांत सामन्यतः खालील स्थिती गर्भाशयांत येते व ही स्थिती प्रसवापर्यंत सामान्यतः तशीच राहते व प्रसुतीच्या वेळी स्वभावतः डोके खाली अपत्य मार्गात येते. त्याला कारण वायू असतो असे घडले तर ती प्रकृती यापेक्षा वेगळे घडले तर ती विकृती असते. ७ व्या महिन्यांत प्रसुती झाली तर बाळ जगते.
सर्व अंग प्रत्यंग पूर्ण झालेला गर्भ प्रसुतीच्या काळापर्यंत मातेच्या उदरामध्ये डोकेवर करून (हृदयाकडे), सर्व अंग संकुचित करून (पाय पोटाशी घेऊन हात जोडून डोके खाली वाकवून ) मातेच्या पाठीकडे तोंड वळलेल्या स्थितीत कधी उजव्या तर कधी डाव्या बाजूला असतो.
नपुंसक असल्यावर मध्यावर असतो. मुलाचे लिंग असल्यास उजव्या कुशित , मुलीचे लिंग असल्यास डाव्या कुशित असतो.
सध्या वरील प्रमाणे सापडतेच असे नाही. उताणे झोपल्याने गर्भ नाडी गर्भाच्या मानेभोवती गुंडाळली जाते. रिक्षा,स्कूटर यांच्यातून प्रवास केल्यानेही असे घडते किंवा गर्भ स्थितीत फरक पडतो.शिवाय अपरेच्या स्थितीनुसार गर्भ स्थितित फरक पडतो.
सर्वाङ प्रत्यंङ विभागः प्रव्यक्ततरः ॥ सु.शा. ३/३० गर्भः सर्वैः भावैः आव्यायते ॥ गर्भिणी क्लान्ततमा भवति ॥ च.शा.४/२३ सर्वेः सर्वाङ संपूर्णो भावैः पुष्यति ॥ वा.शा. १/२७ याच कारणामुळे ७ व्या महिन्यातप्रसुती झाली तर बाळ जगते. गर्भस्तु खलु मातुः पृष्टाभिमुखौ उर्ध्व शिरा संकुच्याङा न्यास्तेऽन्तः कुक्षौ ॥ च.शा. स च उपस्थित काले जन्मनि प्रसूति मारूत योगात् परिवृत्यावाक् शिरा निष्क्रामत्यपत्या पथेन , एषा प्रकृतिः विकृतिः पुनरतोऽन्य च आभुग्नोऽभि मुखे शेते गर्भाशये स्त्रियाः स योनिं शिरसा याति स्वभावात् प्रसवं प्रति ॥ सु.शा.५/ ४५ गर्भस्तु मातुः पृष्टाभि मुखो ललाटे कृतांजली , संकुच्याङॊ गर्भ कोष्ठे दक्षिण पार्श्वमाश्रित्य अवतिष्ठेत् पुमान् वाम स्त्री मध्यं नपुंसकं ॥ अ.शा.२/२१ 28th week : Lung alveloli expands.
आठवा महिना
आठव्या महिन्यांत ऒज अस्थिर असते.कधी मातेमध्ये तर कधी गर्भामध्ये ते संचार करते. गर्भाच्या या स्थितीमुळे गर्भिणी म्लान तर कधी खुषीत / हर्षित होते. या महिन्यात प्रसुती झाली व ओज बालकांमध्ये नसेल तर बालक मृत्यू पावते व ते आईकडून बालाकाकडे गेले असेल माता मरण्याची शक्यता असते. अष्टमे अस्थिरीभवति ओजः तत्र जातश्चेन्न जीवेत् निरोजस्वात् नैऋत्य भागात्वाच्च ॥ सु.शा.६/३० शिशुरोजो न वस्थान्नारी संशयिता भवेत् ॥ वा.शा. गर्भश्च मातृतः गर्भतश्च माता ओष आददाते ॥ तस्मात्तदा गर्भिणी मुहुर्मुहुः मुदा यक्त भवति ॥ मृदुस्वम्लाना ॥ च.शा.४/२४
(येथे नक्की काय घडते याचे नेमके कारण समजू शकत नाही.)
नववा महिना
नवव्या महिन्यात गर्भ सर्व शरीर अवयवांनी पुष्ट होऊन प्रसवोन्मुख होतो. दहा महिन्यापर्यंत आई व बाळ प्राकृत असेल तर झालेली प्रसुती प्रकृतच समजली जाते. दहा महिन्यानंतर प्रसुती न झाल्यास ती विकृती मानावी.
तस्मिन्नेक दिव सातिवान्तेऽपि नवमं मासं उपादाय प्रसव कालं आदशमात् मांसात् ॥ च.शा. ४/२५ नवमदश मैकादश द्वादशानाममन्य तस्मिन् जायते, अतोऽन्यथा विकारो भवति ॥ सु.शा. ३/३०
36th week : Colourless hair completely disappear.
36th week : Bone marrow takes the function of haematopoiesis.
36th week : Lecithin & sphingomyelin lowers the surface tension of amniotic fluid and helps the alveoli to open easily when breathing starts following the delivery.
गर्भासंबधी
गर्भ मल –मूत्र व वायूचे निस्सारण करीत नाही. मलाल्पत्वाद्योगाच्च वायोः पक्वाशयश्च च ॥ वात मूत्र पुरीषाणि न गर्भस्थ करोति हि ॥ सु.शा.२/५३ गर्भ उदरामध्ये असताना मल, मूत्र व वात निस्सरण करीत नाही याला दोन कारणे आहेत. गर्भ पोटांतून अन्न घेत नसल्याने त्याच्या पचनातून निर्माण होणारा अन्नमल तयार होत नाही. गर्भावस्थेमध्ये निर्माण होणारे पाचकस्राव व अन्नवह स्रोतसांतील मृतपेशी याचा मल अत्यंत अल्प असल्याने गर्भ मल प्रवृत्ती करीत नाही हे सत्य आहे व अर्वाचीन शास्त्रास ते मान्य आहे. मात्र प्रसूतीला वेळ लागला किंवा गर्भाच्या ठिकाणी काही आपत्ती उद्भवली तर गर्भाच्या गुदावाटे मलस्वरूप स्राव गर्भोदकांत पडतात. त्याला मेकोनीयम असे म्हणतात. या मेकोनीयम मध्ये गर्भाने प्यायलेले गर्भजल, गर्भाचे केश, गर्भाच्या मृत त्वचेचा समावेश असतो. शिवाय अन्नवह स्रोतसाने निर्माण केलेले स्राव , यकृत स्राव , अन्नवह स्रोतसाच्या मृत पेशी यांचा समावेश असतो. बाळ मूत्र प्रवृत्तीही करत नाही कारण देताना मळच नसल्याने सार किट्ट विभजन संभवत नाही व पक्वाशयाची निर्मिती झालेली नसते. त्यामुळे मूत्र निर्मितीचा प्रश्न येत नाही अस आयुर्वेद म्हणतो. प्रत्यक्षांत वस्तु स्थिती अशी आहे की गर्भोदकांतील पाचव्या महिन्यानंतरचा ५०% हिस्सा हे गर्भाचे मूत्र असते. गर्भ गर्भाशयांत मूत्र प्रवृत्ती करतो. सगर्भावस्थेत गर्भ तिस-या महिन्यांत नेफ्रॉन (वृक्काचे) च्या कार्यकर्तृत्वातून मूत्र निर्माण करू लागतो. ९ व्या महिन्यात त्याचे प्रमाण दर दिवसाला ६५० मिली लिटर इतके होत. यामुळे मूत्र निर्मितीच्या व मूत्र प्रवृत्तीच्या विधानाला छेद बसला. पक्वाशयाची उत्पत्ती ३-या महिन्यांतच पूर्ण होते व गर्भ गर्भजल ही पीत असतो.या पाण्याचे शोषण व निस्सरण हे व्हावयास हवे असते. ते येथे झालेले दिसते हे काम वृक्क करीत असते. त्यामुळे पक्वाशयांत मूत्रोत्त्पत्ती होत असते या आयुर्वेदाच्या विधानाला छेद बसतो. म्हणून मी माझ्या मागे लिहिलेल्या लेखांमध्ये लिहिल्याप्रमाणे वृक्काचे कटीर हे ‘ मूत्रवह स्रोतसाचा पक्वाशय ’ मानले पाहिजे कारण मध्यम व बाह्य मार्गातून धातूंचे धात्वग्नीने पचन केल्यानंतर जो द्रवीभूत मळ रस रक्तांत येतो तो बाहेर काढण्याचे काम मूत्रवह संस्था करते व तो वृक्कातूनच बाहेर पडतो. मूत्रवहस्रोतसाला स्वतःचे वेगळे अस्तित्व आहे. आयुर्वेदाने गर्भ वायूचीही उत्पत्ती करीत नाही असे म्हटले आहे पचनाच्या शेवटी सार किट्ट विभजन होते, अन्नाला कटुत्व येते व त्यातून वायूची उत्पत्तीही होते त्यानुसार हे खरच आहे. तरी सुध्दा मेकोनीयमचा प्रवास जन्मापर्यंत वरून गुदापर्यंत झालेला दिसतो, अन्नवह स्रोतसांत वायूची उत्पत्ती झाल्याखेरीज संभवत नाही. शिवाय त्याला खूप द्रवत्वही नसते की ज्यामुळे तो जलीयत्वामुळे किंवा पर्थिवत्वामुळे खाली यावा. महास्रोतस ७व्या महिन्यांत पूर्णत्वाला गेलेले असते हे सत्य आहे म्हणून आयुर्वेदाप्रमाणे ७व्या महिन्यांत जन्मलेले मूल जगते. अर्वाचीन शास्त्रासही ते मान्य आहे. आयुर्वेदात गर्भाच्या मासानुमासिक वाढीमध्ये अग्निची उत्पत्ती ६व्या महिन्यांत होते येथे अग्निची याचा अर्थ आमाशय, ग्रहणी , यकृत, अग्न्याशय असा घ्यावयाचा आहे त्यामुळे येथेही आयुर्वेदाने मल, मूत्र, व वायूच्या निस्सारणाबाबत केलेल्या विधानाला छेद बसतो. वायूचे निस्सरण गुदाबाहेर होत नसते.
सगर्भावस्थेमध्ये गर्भश्वास घेत नाही व रडतही नाही.
जरायुणां मुखेच्छन्ने कण्ठेच कफवेष्टिते ॥ वायोमार्ग निरोधाच्च न गर्भस्थः प्ररोदती ॥ निः श्वाशोच्छवास संक्षोभ संचलनम् स्वप्नान् गर्भोऽपि गच्छति ॥ मातृर्निश्वसितोच्छ्वास सक्षोभ स्वप्न संभवात् ॥ सु. शा. २/ ५४, ५५ गर्भाचे तोंड जरायुने व कण्ठ कफाने आच्छादित असतो त्यामुळे वायूचा मार्ग बंद असतो त्यामुळे गर्भ रडत नाही. यातील गर्भ हा गर्भावस्थेत गर्भजल पीत असतो म्हणजे त्याचे तोंड बंद असते या आयुर्वेदानी केलेल्या अनुमानाला छेद बसतो. रोदन या क्रियेत श्वास बाहेर जाणे हे आवश्यक असते. त्यामुळे गर्भाची श्वसनाची क्रिया आधी सुरू व्हावी लागते व नंतर रोदन येते. सगर्भावस्थेत फुप्फुसाचे वायू कोश बंद स्थितीत असतात. प्रसवाच्या वेळी गर्भ योनी द्वारांतून बाहेर येताना छातीवर दाब पडून ती संकुचित होते व प्रसूत होताच छाती फुगते, बाहेरील हवा आत येऊन वायूकोश फुगतात व मग श्वसन क्रिया सुरू होते व त्यानंतरच रोदन सुरू होते. उरः हे संकोच व प्रसरणशील आहे. गर्भाबाहेर येताना छातीचा, अरुंद अशा कटीर व योनीमार्ग दाबामुळे संकोच होतो. गर्भ बाहेर येताच त्याच्या स्थिती स्थापक गुणांमुळे उरःप्रकृत स्थितीत येते व हवा बाहेरून आत येते व त्यात हवा येण्यानी फुगा जसा हवा भरल्यावर फुगतो त्याप्रमाणे फुप्फुसाच्या वायूकोशांत हवा भरते. कंठात मात्र श्लेष्मा प्रमाणापेक्षा जास्त असला तर या क्रियेस कंठात रोध होतो. आईच्या श्वासाबरोबर, झोपण्याबरोबर व हालचाली करणे या गोष्टी करीत असतो. अर्वाचीन शास्त्राप्रमाणे गर्भाच्या श्वसनाच्या हालचाली तिस-या महिन्यांतच समजून येतात पण त्या गर्भ पाच महिन्याचा होईपर्यंत अतिशय अनियमित असतात.त्याचा वेग ३० ते ७० पर्यंत असतो याचाच अर्थ असा आहे की आईच्या श्वसनाबरोबर गर्भाचा श्वास चालतो या विधानाला छेद बसला. आईचे श्वसन १६ ते १८ द.मि. असते. साधारणतः गर्भाच्या हालचाली सरासरीने १२ तासांत १० असावयास हव्यात त्या त्यापेक्षा कमी असतील तर त्याचा अर्थ असा केला जातो की अपरा तिचे काम योग्य रितीनी करीत नाही. आईच्या दिवसभराच्या हालचालींपेक्षा खूपच जास्त असतात. साधारणतः गर्भ झोपलेला असेल तर गर्भाच्या हालचाली मंदावतात. खूपवेळा असे सापडते की माता निद्रिस्थ असताना त्या वाढतात व त्यामुळे आईला झोप येत नाही. रात्री हालचाल करणारे गर्भ जन्मल्यानंतर दिवसा झोपतात व रात्र जागवितात. म्हणजेच आईची झोप व बाळाची झोप याचा एकमेकांशी फारसा संबंध नसावा.
Please note: The article(s) were written by Dr. R. B. Gogate during 1961-2010. The fundamental relevance of these holds true even today, yet the readers/viewers should consider the timeline and the limited availability of the resources which might conflict with the recent advancements.
