Vaidya Gogate Memorial Foundation
Vaidya Gogate
Memorial Foundation
About Us
Events
Gallery
Videos
Articles
Shop
Clinics
Contact
Certificates
Legal
Signed out
Vaidya Gogate Memorial Foundation

Vaidya Gogate

Memorial Foundation

Ayurveda education, publications and clinical care.

102, Ramprasad Chambers, 368/1, Jawaharlal Nehru Rd, near Kirad Hospital, above Shraddha Medicals, New Nana Peth, Pune, Maharashtra 411002

Clinic hours: Monday–Thursday, 6:00 PM–10:00 PM

care@vaidyagogate.org093737 92952

Explore

  • About Us
  • Events
  • Gallery
  • Videos
  • Articles
  • Shop
  • Clinics
  • Contact
  • Certificates

About Us

  • About Us
  • Foundation
  • Legacy of Vaidya R. B. Gogate
  • Dr. Anagha Gogate
  • Awards & Accolades
  • Competition awards
  • Special thanks
  • Books & Research
  • Our History
  • Trustees & Team

From the Foundation

  • Contact
  • Certificates

Connect

© 2026 Vaidya Gogate Memorial Foundation. All rights reserved.

PrivacyTermsShippingReturnsRefundCancellationFAQTrack a shipment

Developed by Capture Visual Studios

Home/Articles
Ayurveda4 Nov 2026

अर्बुद (Tumour)

Published by Vaidya Gogate Memorial Foundation

Share

FacebookXLinkedInWhatsAppTelegramEmail

आयुर्वेदांत उंचवटाउंच असे तीन व्याधी प्रामुख्याने वर्णन केले आहेत ते म्हणजे ग्रंथी, गुल्म व अर्बुद. या खेरीज व्रणाशोथ व विद्रधी यांचेही वर्णन आयुर्वेदांत आहे. त्यापैकी व्रणशोथ व विद्रधी हे आशुकारी स्वरुपांत प्राधान्याने सापडतात. त्याचे निदान वा चिकित्सेतही अडचण येत नाही. गुल्मामध्ये मात्र रक्तगुल्म हा संदेह निर्माण करणारा आहे. म्हणजे नेमके काय ? का तो व्याधी पूर्वी होता व आता लुप्त झाला ? का आम्हाला समजला नाही ? ‘अर्बुद’ हा उत्सेध सामान्य व्याधी आहे. त्याचे निदान, चिकित्सा व साध्यासाध्यत्व अर्वाचीन शास्त्राशी तंतोतंत मिळते जुळते आहे. या अर्बुदांमध्ये काही अर्बुदांना चिकित्सा नाही किंवा ते सध्याची सर्व उपलब्ध चिकित्सा करूनही असाध्यच आहेत. त्यांच्यावर उपचार शोधण्याचा व रोग नष्ट करण्याचे औषध शोधण्याचा जागतिक प्रयत्न आहे. अर्बुदे दोषज: औषधाने बरी होणारी, वातज, पित्तज, कफज, सन्निपातिक छेद्य: छेदनानी बरी होणारी, मेदार्बुद (Lipoma) ,अस्थ्यार्बुद (ऑस्टिओमा), जलार्बुद (हायग्रोमा) निःशेष छेदनानी: अ) बरी होणारी. उद|: पोटॅटो, पॅरॉटीड ट्यूमर ब) छेदन+ अग्निकर्म / क्षारकर्म / बरी न होणारी १. मांसार्बुद (Epithelial) कॅन्सर २. रक्तार्बुद (मिझेंकायलम) सार्कोमा,रक्ताचा भरपूर पुरवठा असणारी. दोषज अर्बुदे ही तत्कालीन दोष दुष्य संमूर्च्छनेतून निर्माण होतात व ती काही वेळा आपोआप (सेल्फ रिग्रेसीव्ह) बरी होतात किंवा औषधाने बरी होतात. यामध्ये अंगावर अचानक येणारे तीळ, तांबडी चखंदळे, नॉन हॉजकिन्स लिम्‍फोमा ही त्याची काही उदाहरणे सांगता येतील.

छेद्य अर्बुदे शरीराच्या एखाद्या भागांत धातुच्या आश्रयानी उत्सेध निर्माण होतो. हा उत्सेध त्या धातुस्थळी त्याच धातुंच्या अनेक पेशी निर्माण झाल्यामुळे होतो. या पेशी, मूळ धातु पेशींसारख्याच असतात. त्याच्या मुळे शरिरांत इतरत्र कोठेही स्रोतोदुष्टी किंवा दोष दुष्टी लक्षणे नसतात. त्याच्यामुळे काहीवेळा दैनंदीन क्रियेत अडथळा येतो. किंवा त्याचा दाब इतर भागावर पडल्याने काहीं त्रास दायक लक्षणे निर्माण होऊ शकतात. या अर्बुदांमुळे जीवाला धोका नसतो. मेदार्बुद (लायपोमा) अस्थ्यार्बुद (ऑस्टिओमा), जलार्बुद (हायडॅरीड? ) ही या अर्बुदांची उदाहरणे देता येतील. ही अर्बुदे समूळ काढून टाकणे तर पुन्हा होत नाहीत येथे संपूर्ण छेद झाला आहे किंवा नाही अशी आशंका असली तर त्या छेद्य भागावर क्षारकर्म किंवा अग्निकर्म करावे. अग्नीकर्मानी बरे झालेले व्याधी पुनः होत नाहीत.

असाध्य अर्बुदे ही अर्बुदे छेदन (निःशेष), अग्निकर्म, क्षारकर्म करूनही बरी होत नाहीत असा आयुर्वेदाचा अनुभव असल्याने व्यवसायांत यश इच्छिणा-या शल्यतंत्रज्ञाने या अर्बुदांवर शस्त्र चालवू नये असे आयुर्वेद सुचवितो. हे खरे असले तरीही काही वेळा अ) या अर्बुदांमुळे- बाह्य स्रोतसांत मार्गावरोधाची संप्राप्ति घडते. काहीवेळा त्यांतून प्रभूत रक्तस्राव होऊ लागतो अशावेळी तेथे शस्त्रकर्म करावेच लागते किंवा ब) व्याधीतर असाध्यच आहे. पण झालेली दुष्टी त्या स्थानापुरती मर्यादित असेल (लोकली मॅलिग्नंट) किंवा त्या अर्बुदाचे विक्षेप (सेकंडरीज – द्विर्बद) शरिरांत इतरत्र झाली नसतील तर एक प्रयत्न म्हणून अर्बुद काढून टाकले जाते व नंतर अग्निकर्म, रेडिओथेरपी किंवा केमोथेरपी दिली जाते. ही असाध्य अर्बुदे कशी निर्माण होतात हे पाहणे मनोरंजक ठरेल. शरिराच्या धातुतील एखादी पेशी (सेल) त्याची मूळ अनुवंशिक रचना बदलते. मूळ पेशीचे स्वरुपच बदलते व ही पेशी नंतर त्या ठिकाणी आपल्यासारख्या असंख्य पेशींची पिल्लावळ निर्माण करते. यापेशी अपक्व, मूळपेशीपेक्षा भिन्न व त्यांच्या वाढीवर शरिराचे नियंत्रण न राहिल्याने त्याची वाढही अमर्याद असते. रुग्ण खंगत गेला तरी त्याचा परिणाम अर्बुदाच्या वाढीवर होत नाही. त्यात आणखी वाईट गोष्ट म्हणजे त्यांचे विक्षेप शरिरांत इतरत्र होतात. आणि मग ही स्थानिक स्वरुपाची दुष्टी सार्वदेहिक होते. शरिरांतील एखादीच पेशी आपली अनुवंशिकता का बदलते याचे उत्तर अद्याप सापडत नाही. आपल्या शरिरास या बदललेल्या अनुवंशिकतेची माहिती नसल्याने त्याची वाढ रोखण्याची अक्कल आपल्या शरिरास नसते आणि म्हणून वाढ अमर्याद होते. (आपल्या शरीरास नेहमीच्या प्राकृत पेशी प्रमाणापेक्षा जास्त निर्माण होत असल्यास त्या थांबविण्याची अक्कल आहे. यकृताचा एखादा तुकडा कापला गेला तर शरीर पुन्हा तेवढ्या पेशी निर्माण करते व तेवढ्या त्या निर्माण झाल्या की पेशींची वाढ थांबविते. अर्वाचीन शास्त्रांत याला हायपरप्लेजिया म्हणतात. अशी ही अर्बुदे उत्पन्न झाल्यावर त्यांची साध्यासाध्यता जेथे जेथे शक्य असेल तेथे तेथे ठरविली जाते. त्याच्या चार श्रेण्या आहेत. श्रेणी जेवढी वरची तेवढी असाध्यता जास्त. १) स्पर्श दगडाप्रमाणे पण गाठ कुठेही चिकटलेली नाही. २) गाठ त्वचेस किंवा स्नायुस चिकटलेली असणे. अचल होणे. ३) स्थानिक रसग्रंथी वाढलेल्या असणे. ४) शरिरात इतरत्र विक्षेप झालेले असणे. उतीपरिक्षण- बायोप्सी- यांत त्या अर्बुदाचा तुकडा काढून तो सूक्ष्मदर्शक यंत्रात तपासला जातो. खर तर उती परिक्षण संग/ प्राकृत भाग व विकृत भाग यांच्या संगमावर करणे आवश्यक असते. (F.N.C.) मध्ये त्याचे खरे निदान होते का ठाऊक नाही. १) २५% विकृत पेशी २) ५०% विकृत पेशी, ३) ७५% विकृत पेशी ४) १००% विकृत पेशी. हे वर्गीकरण साध्यासाध्यत्व ठरविण्यास उपयोगी असते हे खरे पण काही अर्बुदे स्वभावतः च शीघ्र गतीने वाढणारी असतात. आयुष्यांत प्रत्येक अवयवाचा उत्कट काल असतो. या उत्कट कालात जर ही अर्बुदे त्या अवयवांत किंवा भागांत निर्माण झाली तर त्याची वाढ इतर अर्बुदापेक्षा जास्त झपाट्याने होते. याची उदाहरणे द्यावयाची झाली तर ऍक्युट लॅक्टोजेनिक कार्सिनोमा ऑफ ब्रेस्ट , ओव्हरीचा पाळी सुरु असताला झालेले ट्यूमर, तरुणवयांत प्रोस्टेटच कॅन्सर. या खेरीज सर्व मेलानोमा व सार्कोमा हे स्वभावतःच झपाट्याने वाढणारी अर्बुदे आहेत.

आपल्या शरीराचे प्राकृतत्व बिघडवून टाकणा-या गोष्टी आयुर्वेदांत वर्णन केल्या आहेत- अती दीर्घ - -हस्व, कृष्ण-गौर,लोम अलोम, कृश व स्थुल- यांत एकतर पेशींची वाढ किंवा क्षय आहे किंवा त्याच्या प्रकृतरंगात प्रमाणापेक्षा अधिक बदल आहे. आणि हे सर्व हार्मोन्सच्या अखत्यारित येते. व्यवहारांत क्लायनेस्टेरॉलचे प्रमाण वाढले तर ब्रेस्ट कॅन्सर होतो, प्रोस्टेटच्या मॅलिगनस्सी मध्ये मुष्कग्रंथी काढून तो बरा होतो किंवा त्याच्या विरुध्द गुणाचा क्लायनेस्टेरॉल हार्मोन देऊन तो बरा होतो. हार्मोनचे कार्य वातासारखे आहे. तो बिघडला की – प्रमाणापेक्षा वाढ, तुकडे तुकडे करणे,विचित्र स्वरुप देणे व इतरत्र फेकून देणे या सर्व क्रिया तो घडवून आणतो. असलेले मूळ स्वरुपच तो बदलून टाकतो. वादळ हे त्याचे उदाहरण देता येईल. दुसरी प्रक्रिया अग्नीची आहे. अग्निमुळे द्रव्याचे मुळ स्वरुप बदलते. तो योग्य प्रमाणात दिला तर तो आपल्याला हवा तसा मऊ रंगाचा, चवीचा पदार्थ देतो अन्यतः तो तो पदार्थ जाळून खर पाक करतो किंवा अपक्व ठेवतो. त्यामुळे अर्बुदाच्या घटनेत दुर्बल अग्नि हेहि महत्त्वाचे कारण ठरते. त्यामुळे या असाध्य अर्बुदांच्या निर्मितीत वात प्रकुपित / विगुण किंवा विषमाग्नि हे कारणीभूत होतात. शुक्रधातु प्राकृत असेल तर सर्व शारीरवयाची निर्मिती प्राकृत होते. हा शुक्रधातु स्परमॅटीन व स्परमॅटिडीनच्या द्रवांत असतो व तो शुक्रधातुची प्राकृतावस्था ठेवण्यास मदत करतो. हाच पदार्थ प्रत्येकपेशी मध्ये असतो व तो त्या पेशीच्या (DNA, RNA) ला प्राकृत ठेवण्यास मदत करतो. थोडक्यात ही संकल्पना आयुर्वेदाने वर्णन केलेल्या सर्व शरीर व्यापी शुक्रधरा कलेशी मिळतो जुळती आहे. या दोन द्रव्यांत झालेला बदल (DNA,RNA) मध्ये बदल घडवून काही वेगळेच निर्माण करू शकतो. त्यामुळे त्या पेशीच्या ठिकाणच्या शुक्रधातु कलेत आलेले वैगुण्य हे ही अशा विगुण पेशीच्या निर्मितीस कारणीभूत होत असावेत. मुळांत विकृतपेशी उत्पन्न का होतात याचे कारण अद्यापही सापडत नाही. ते शोधण्याचा वर नमुद केलेला एक प्रयत्न आहे. कदाचित तो खरा ठरू शकेलही. विक्षेप होण्यास ही शुक्रधरा कलाही कारणीभूत होत असावी.

DNA is the genetic code of the cell. DNA in a cell contains all the gens for the organisation, but only those needed for the formation of particular cell will be active. मांसधातु तयार करावयाचा असेल तर (DNA) मधील ते तयार करणारे (genetic code) उद्दीपित होते. प्रभावित होते हीच क्रिया सर्व शरिरस्थ धातूंना लागू आहे. काही अर्बुदे ही स्थानिक स्वरुपाची असतात व त्यांचे विक्षेप शरिरात इतरत्र होत नाहीत याचा अर्थच असा की त्यांना जागीच थोपवून धरण्याची अक्कल आपल्या शरिरात असते. ज्या अर्बुदांचे विक्षेप- द्विर्बुदे इतरत्र होतात ते विक्षेप थांबविण्याचा प्रयत्नही शरीर करीत असते व अशी प्रतिकार यंत्रणा स्तनाच्या अर्बुदामध्ये सापडते. तसेच स्थानिक रसग्रंथी हे विक्षेप थोपवून धरण्याचे काम करतात पण या प्रयत्नात शरीर अपुरे पडते व विक्षेप होतात. काहीवेळा हे विक्षेप पसरविण्यासाठी “सर्जन्स नाईफ” कारणीभूत होते. ही नाईफ शरिराने निसर्गतः बंद करून ठेवलेले दरवाजे उघडते व त्यामुळेही विक्षेप लवकर होतात. हे विक्षेप प्रामुख्याने रसरक्त वाहिन्यातून व लसीका वाहिन्यातून होतात. अर्बुदाचा एकूण विचार करता संप्राप्ति स्थान दुष्टी दोष वैषम्याचा विचार फक्त दोषज अर्बुदांपुरता मर्यादित राहतो. मांसार्बुद व रक्तार्बुदांत अभिघात हे महत्त्वाचे कारण सांगितले आहे. अभिघात हा पूर्वीचा केव्हाचाही असेल. अभिघाता मध्ये प्रत्यक्षतः त्या स्थानाच्या पेशी दबतात, मोडतात, त्याच्या न्युक्लीयसला किंवा (DNA RNA) ला धक्का पोहोचतो. साहजिकच त्याचे प्राकृत स्वरुप जाते. या मृत पेशी शरीर काढून टाकते पण अर्धवट आघात झालेल्या पेशी तशाच राहतात व त्यानंतर विगुणतः धारण करतात. मला असे वाटते येथे अभिघात म्हणजे केवळ मार लागणे असा न घेता कोणतेही आगंतू कारण त्यात समाविष्ट करावे कारण आगंतुकारणाने व्याधि आधी होतो व सार्वत्रिक दुष्टी नंतर होते. अर्बुदांच्या बाबतीत तसेच आहे. विक्षेप किंवा द्विर्बुदे ही खूप नंतर होतात. आगंतु कारणात अभिघाता- खेरीज इतर कारणे सांगितली आहेत. ‘ भूत’ यांत सूक्ष्मजंतु, व्हायरस ,बॅक्टेरिया यांचा समावेश होतो. त्यांच्यामुळे कॅन्सर- दुष्ट अर्बुद होते हे खरच . (HIV) व्हायरसमुळे होणारा- कापोसिज सारकोमा किंवा ऑस्ट्रेलियन व्हायरसमुळे होणारा हिपॅटोमा या सारखी त्यांची उदाहरणे आहेत.

विष – यांत अनेक औषधांचा समावेश आहे. यांत प्रामुख्याने प्राण्यांमध्ये कृत्रीम पध्दतीने कॅन्सर निर्माण करणारी औषधे येतात. तसेच ऍनिलिन डाय सारखे रंगही येतात. बेंझामीन, ऍरोमॅटिक अमाईन्स, २ नेप्थ्यॅलामाईन, इम्युनो सप्रेसंट औषधे ही यांत येतात. वायु- भोपाळ दुर्घटनेतील मेथिलीन वायु व त्याचे उपद्‍व्याप सर्वज्ञात आहेत. वा-याबरोबर उडून आलेली ऍटोमिक्‍ डस्टही अशा त-हेची अर्बुदे उत्पन्न करु शकते. अग्नि- रेडिएशन्स मुळे होणारी अर्बुदे ज्ञात आहेतच . काश्मीरमध्ये काश्मीरी लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटलेले कोळसे असलेले मडके पोटावर बांधतात. त्यामुळे होणारा कॅन्सर ज्ञात आहे. सन बर्न्सचे रुपांतर काही रुग्णांत कॅन्सर मध्ये होते काय अशी शंका आहे. सप्रहार – यांत मोठा आघात अभिप्रेत आहे असे नाही. एखाद्या भागावर दीर्घकाळ आघात होत राहीला तर त्याचे रुपांतर अर्बुदामध्ये होते. पूर्वी नऊवारी साड्या घट्ट बांधल्यामुळे तो होत असे तंबाखु चुना खाण्यापेक्षा तो गालांत ठेवल्याने होणा-या कॅन्सरचे प्रमाण ज्ञात आहे. पित्ताशयांत निर्माण झालेल्या पित्ताशयाच्या व खड्याच्या घर्शणाने कॅन्सर होतो. थोडक्यात अर्बुदाची ऊत्पत्ती स्थानिक स्वरुपाची असल्याने आगंतु कारणांना महत्त्व देणे महत्त्वाचे आहे हे खरच. आयुर्वेदामध्ये अध्यार्बुद संकल्पना आली आहे. त्याचा अर्थ – त्या अर्बुदावर तसेच दुसरे अर्बुद उत्पन्न होणे असा होतो.

अर्बुदांची चिकित्सा १) दोषज अर्बुदांची चिकित्सा ग्रंथाप्रमाणे करावी. २) लायपोमा- मेदार्बुद, अस्थ्यार्बुद यांचे छेदन करावे. ३) लोकली मॅलिग्नंट अर्बुदे – निःशेष छेदन, क्षारकर्म व अग्निकर्म. ४) मांसार्बुद व रक्तार्बुदामध्ये- २ अ) शक्यतो काही करू नये. ब) या अर्बुदामुळे मार्गावरोधज संप्राप्ति निर्माण झाली असल्यास- अर्बुदास हात न लावता दुसरा मार्ग करावा. गलनालाचा विकार असेल तर आमाशय छिद्रीकरण(गॅस्ट्रोस्टोमी), गुदाचा असेल तर पक्वाशय छिद्रीकरण (कोलोस्टॉमी) ,बस्तीचा असेल तर गवीनीपक्वाशय संयोजन, उर्ध्वश्वास वाहिन्याचा असेल तर श्वास नलीका छिद्रीकरण (ट्राकिओस्टॉमी) सारखी शस्त्रकर्मे पसंत करावीत. क) या अर्बुदांतून प्रभूत रक्तस्राव होत असेल तर तेथे छेदनादी उपक्रम करावा. ड) दैव बलवत्तर असते. रुग्णाने शस्त्रकर्माचा हट्टच धरला व जर विक्षेप इतरत्र नसतील तर कल्पना देऊन शस्त्रकर्म करावे. येथे कल्पना नातेवाईकांना द्यावयाची आहे कारण आयुर्वेद मनोभिघातालाही प्राधान्य देतो. खर तर सर्जनची सुरीच खूपवेळा अर्बुदाचे विक्षेप वाढविण्यास किंवा अर्बुद वाढण्यास कारणीभूत होते. कॅन्सरच्या चिकित्सेच्या बाबतीत ती चिकित्सा बहुतांशी रुग्णाचे प्राण व पैसा वैद्याने हिसकावून घेण्यासारखीच ठरते. आयुर्वेदामध्ये – प्रामुख्याने मांसार्बुदामध्ये मांस किंवा सदृश पदार्थ खाऊ नयेत असे सांगितले आहे. या अर्बुदांमध्ये मांसाचा मुळांतच उपचय असतो “ वृध्दि समानैः सर्वेषाम्‍ या न्यायाने मांसाने अर्बुद वाढू नये असे अपेक्षित आहे. खर तर अर्वाचीन शास्त्राप्रमाणे शरीरांतील अनेक क्रिया प्रोटीन मॉलिक्युलच्या आधारावर चालतात मग असे का याचा विचार करणे गरजेचे आहे. अर्वाचीन शास्त्रामध्ये रक्ताचा वेगळा कॅन्सर सांगितला आहे. या मध्येही रक्ताच्या पेशी प्रमाणापेक्षा वाढणे व त्या विकृत स्वरुपांत निर्माण होणे या साम्यांमुळे सांगितली. वज्रस्थाने नियोजयेत.

आयुःप्रदश्च बलवर्णकरोडातंवृष्य प्रज्ञापदः । शकल दोष गदापहारी दीप्तग्निकृत्यपि विसमान गुणस्तद वैक्रान्तकः खलुवर्णर्बल लोहकारी रसायनेषु सर्वेषु पूर्वगण्यः प्रतापलन । व्रजस्थाने नियक्तव्यौ वैक्रानः । सर्व दोषहा- रसरत्न समुच्चय ५७-५८

त्याचा संबंध मज्जा या धातुशीही येतो. आयुर्वेदानुसार रसरक्त हे एकाच मार्गात असून त्यांचे कार्य धातु प्रमाणेच असल्याने त्यांना धातु मानले आहे आणि म्हणून अर्बुदांशी साम्य आहे. या प्रकारच्या दुष्टीमध्ये – रसरक्त्त ही सर्व शरीरगामी असल्याने – त्या दुष्टीची ज्वर, संधीशूल, पाण्डु, अग्निमांद्यादी लक्षणे इतर अर्बुदांचा विचार करता दिसतात. सर्व लुकीमिया या प्रकारांत येतात. मायलॉईड ल्युकीमिया मध्ये- मधून मधून व्याधी लक्षणे नाहीशी होऊन रुग्ण पुर्ववत होतो. येथे रक्ताचा विचार दोष व धातु असा दोन्ही बाजूनी करता येतो. त्यामुळे येथे चिकित्सेस वाव मिळतो. कारण व्याधीची बरी होण्याकडे स्वतःची प्रवृत्ती असते. आयुर्वेदाने हा विकार अस्थिगत वात, मज्जागत वात, मेदोगत वात यांत वर्णन केला आहे व त्यावर रितसर चिकित्सा दिली आहे. हे रुग्ण इतर किमोसारखी कोणतीही चिकित्सा न घेता वैद्याकडे आले तर या रोगांवरच उपशम देता येतो. इतर अर्बुदांच्या – मांसार्बुद व रक्तार्बुदाच्या बाबत चिकित्सेचा उहापोह केला आहे. शस्त्रकर्म करून वेदना वाढवून भिकारी करून कॅन्सर क्लब काढण्यांत काय अर्थ आहे. आपण दुर्दैवी आहोत एवढेच ना. सम दुखःत्वाने दुःख हलके होते. गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवातून बिब्बा हा मांसार्बुदाची वृध्दि कमी करून मार्गावरोध कमी करण्यास अन्नवह स्रोतसांत उपयोगी पडतो. तो सिध्द घृत, सिध्द दुध किंवा सिध्द ताक या स्वरुपांत वापरता येतो. पक्वाशय व गुदाच्या बाबतीत बिब्बासिध्द ताकाच्या बस्तिचा उपयोग होतो. बिब्याची फुलती दुधांत टाकून ते विरजावे दही करावे व या दह्याच्या ताकाचा उपयोग पोटातून देण्यास किंवा बस्तिसाठी करावा. फणसांबा याचा उपयोग मुखाच्या संबंधात होणा-या अर्बुदांमध्ये व मुखपाकासारख्या विकृतींमध्ये चांगला होतो. त्याचा उपयोग गण्डुष स्वरुपात केला जातो. किंवा उगाळून रोध स्वरुपात / केला जातो. प्रतिसारण स्वरुप वैक्रांत भस्माचा उपयोगही आकार कमी करण्यासाठी ब-यापैकी होतो. खरतर अद्याप कॅन्सरचे खरे कारण कळलेच नाही पूर्वी आयुर्वेदालाही उमगले नाही. त्यासाठी प्रयत्न आवश्यक, कारण सापडले तर औषध सापडेलच . हायपोथॉयरॉईड साठी १॥ रुपयाची मिठाची जागा ८॥ रुपये किलो दराच्या आयोडाइज्ड मिठाने घेऊन ८-१० वर्षे झाली पण हायपोथॉयरॉईडचे रुग्ण वाढतच आहेत. अशीच स्थिती काहीशी कॅन्सरच्या – दुष्टार्बुदांच्या चिकित्सेची आहे. आपल्या शरिरांत प्रचंड (DNA) आहेत त्यांतील १-२ टक्के (DNA) प्रथिनांचे कार्य उमगले आहे राहिलेली सुमारे ९८-९९ टक्के कशासाठी याचे कोडे अजून उमगलं नाही. त्यांचे कडे निश्चित काय कामगिरी आहे हे समजले नाही. निसर्गात कोणतीही गोष्ट विनाकारण तयार होत नसते कारण त्यासाठी ऊर्जेचा वापर आवश्यक असतो. निसर्गामध्ये जीवसृष्टीचा वापर काटेकोरपणे केला जातो असा सिध्दांत आहे आणि मग जर असे आहे तर निसर्गाने DNA च्या एवढ्या असंख्य साखळ्या का केल्या. (कार्य न समजलेल्या DNA ना जंक DNA म्हणतात. एखाद्या वंशात एखादा गुण नसताना सुध्दा तो अचानक का निर्माण होतो यांचे कारण जंक DNA असावे असे शास्त्रज्ञांना वाटते. कॅन्सरच्या (अर्बुदाच्या) उत्पत्तीत असेच असेल, का?

Please note: The article(s) were written by Dr. R. B. Gogate during 1961-2010. The fundamental relevance of these holds true even today, yet the readers/viewers should consider the timeline and the limited availability of the resources which might conflict with the recent advancements.

Gallery

अर्बुद (Tumour)

Related articles